• डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निकमध्ये उद्योजकता जनजागृती कार्यक्रम
कोल्हापूर :
विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यांवर आधारित स्टार्टअप सुरू करून स्वयंरोजगाराकडे वळले पाहिजे. भविष्यातील भारत घडवण्यासाठी तरुणांनी नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी देणारे बनले पाहिजे, असे प्रतिपादन सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकता मंत्रालयाचे (एमएसएमई) प्रतिनिधी किरण काळे यांनी केले.
डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निक महाविद्यालयामध्ये भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्ली तसेच विद्युत मापन उपकरण डिजाइन संस्थान (आयडीईएमआय) मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकता जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात एमएसएमईचे किरण काळे आणि सचिन निकम यांनी विद्यार्थ्यांना उद्योजकतेच्या संधी, शासनाच्या विविध योजना व तांत्रिक नवोपक्रमांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
किरण काळे म्हणाले की, आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवीपुरते शिक्षण पुरेसे नाही. विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यांवर आधारित स्टार्टअप सुरू करून स्वयंरोजगाराकडे वळले पाहिजे. एमएसएमई मंत्रालयाच्या माध्यमातून मिळणाऱ्या सबसिडी, कर्ज योजना व प्रशिक्षण कार्यक्रमांचा योग्य उपयोग केल्यास उद्योग उभारणी निश्चितच शक्य आहे.
सचिन निकम म्हणाले, तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रात अमर्याद संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी आधुनिक कौशल्य आत्मसात करून उद्योजकतेची कास धरावी. करिअरच्या नवनव्या संधी शोधाव्यात. एमएसएमई, आय.डी.ई.एम.आय सारख्या संस्था आपल्या उद्योजकतेच्या प्रवासात भक्कम साथ देतील.
संचालक डॉ. एस. आर. पावसकर यांनी मान्यवरांचे स्वागत करून उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी उपप्राचार्या के. एम. पाटील, कौशल्य विकास समन्वयक राजन डांगरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभार प्लेसमेंट अधिकारी प्रा. ए. व्ही. खामकर यांनी केले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
——————————
नोकरी शोधणारे नव्हे, नोकरी देणारे बना : किरण काळे
RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
23.8
°
C
23.8
°
23.8
°
42 %
3.6kmh
12 %
Mon
26
°
Tue
26
°
Wed
26
°
Thu
26
°
Fri
26
°

