Homeकला - क्रीडाविशाल शिंदे यांच्या ‘लाईव्ह शिल्पकले'ने कोल्हापूरकर मंत्रमुग्ध

विशाल शिंदे यांच्या ‘लाईव्ह शिल्पकले’ने कोल्हापूरकर मंत्रमुग्ध

कोल्हापूर:
येथील कलाप्रेमींसाठी दि. वि. फाउंडेशन च्यावतीने आयोजित करण्यात आलेली ‘कला संवाद आणि जिवंत शिल्पकाम’ (Live Sculpting) ही कार्यशाळा म्हणजे एक अनोखी पर्वणी ठरली. मुंबईतील ‘त्रिमूर्ती आर्ट्स’चे प्रख्यात शिल्पकार विशाल शिंदे यांच्या जादूई हातांतून साकारणारी शिल्पकला प्रत्यक्ष पाहताना कोल्हापूरातील कलारसिक मंत्रमुग्ध होऊन गेले.
शाहूपुरी येथील संत गोरा कुंभार सांस्कृतिक हॉल येथे ही कार्यशाळा पार पडली. यावेळी विशाल शिंदे यांनी चिखलाच्या गोळ्यातून अत्यंत जिवंत वाटणारे शिल्प साकारण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. त्यांच्या हातातील सफाई आणि प्रत्येक अवयवाचे अचूक बारकावे पाहून तरुण, वृद्ध आणि लहान मुलांसह सर्वच कलारसिक भारावून गेले. केवळ प्रात्यक्षिकच नव्हे, तर यावेळी झालेल्या ‘कला संवादाने’ कार्यक्रमात चैतन्य निर्माण केले. विशाल शिंदेनी अत्यंत मोजक्या शब्दांत तांत्रिक बारकावे, छटा आणि कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन यावर मार्गदर्शन केले. कलाकारांशी संवाद साधताना त्यांनी कलेप्रती असलेली निष्ठा आणि मेहनतीचे महत्त्व पटवून दिले.
दि. वि. फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे कोल्हापुरातील नवोदित कलाकारांना एका जागतिक दर्जाच्या शिल्पकाराकडून शिकण्याची सुवर्णसंधी मिळाली. उपस्थित सर्वांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
या कार्यशाळेमध्ये कलामंदिर महाविद्यालयातील तसेच कोल्हापूर शहराबरोबर, चंदगड, आजरा, गारगोटी, इचलकरंजी, सांगली येथील कलाप्रेमी, माती काम करणारे मूर्तिकार – शिल्पकार असे सुमारे २०० हून अधिक कलारसिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन महादेव वडणगेकर, सतिश वडणगेकर, उमेश कुंभार, दिनकर कुंभार, सचिन पुरेकर यांनी केले. यासाठी अभिजीत सूर्यवंशी यांचे विशेष सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
24.5 ° C
24.5 °
24.5 °
52 %
4.8kmh
1 %
Sat
24 °
Sun
27 °
Mon
26 °
Tue
26 °
Wed
26 °

Most Popular

You cannot copy content of this page