कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संलग्न प्राथमिक दूध संस्थांची दुधातील फॅट, एस.एन.एफ तपासणीचे जुने (मिल्को टेस्टर) मशीन कंपनीना बायबॅक (पुनर्खरेदी) करून नवीन दूध तपासणीचे ॲनालायझर मशीन उपलब्ध करून देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेमधील सहभागी गोकुळ संलग्न प्राथमिक दूध संस्थांना नवीन ॲनालायझर मशीनचे वाटप गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत गोकुळ शिरगाव येथे करण्यात आले. यावेळी प्राथमिक दूध संस्थांचे प्रतिनिधी व मिल्क ॲनालायझर कंपनीचे प्रतिनिधी, कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगले, युवराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, मिल्कोटेस्टर विभागाचे प्रमुख बाजीराव मुडूकशिवाले, डॉ. एम. पी. पाटील, प्राथमिक दूध संस्थेचे प्रतिनिधी, मिल्क ॲनालायझर कंपनीचे प्रतिनिधी, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
——————————
गोकुळची दूध संस्थांसाठी जुनी मिल्को टेस्टर मशीन बायबॅक योजना
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
24.5
°
C
24.5
°
24.5
°
52 %
4.8kmh
1 %
Sat
24
°
Sun
27
°
Mon
26
°
Tue
26
°
Wed
26
°

