• बेळगावचा रिधान कलघटगी उपविजेता
कोल्हापूर :
चेस असोसिएशन कोल्हापूर व चेस असोसिएशन इचलकरंजी यांच्या मान्यतेने लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी आणि केन चेस अकादमी इचलकरंजी आयोजित नऊ वर्षाखालील खुल्या मुला-मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरचा अवनीश जितकर अजिंक्य तर बेळगावचा रिधान कलघटगी उपविजेता ठरला. तसेच विहान अस्पतवार – तृतीय क्रमांक, अनुप कानडे चतुर्थ क्रमांक, पाचवा क्रमांक शिवांश सुतार यांनीही यश संपादन केले.
लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीच्या सभागृहामध्ये या स्पर्धा झाल्या. बेळगाव, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, जयसिंगपूर, निपाणी, गडहिंग्लज व स्थानिक इचलकरंजी येथील एकूण १०० नामांकित बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्विस् लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाचे आंतरराष्ट्रीय नियमानुसार खुल्या नऊ वर्षाखालील मुलां-मुलींच्या गटात एकूण आठ फेऱ्यात स्पर्धा झाली.
स्पर्धा संचालक कृष्णावतार भराडिया, लिंगराज कित्तूरे, अरुण पाटील व केन बुद्धिबळ अकादमीचे मुख्य प्रशिक्षक रोहित पोळ यांच्या हस्ते विजेत्याउना रोख पारितोषिक, ट्रॉफी आणि पदके देवून गौरविण्यात आले. यावेळी रेश्मा नलवडे शाळेत बुद्धिबळ – वरिष्ठ बुद्धिबळ प्रशिक्षक रेश्मा नलवडे, मुख्य पंच करण परीट व विजय सलगर ,करण दबडे, अथर्व तावरे यांच्यासह बुद्धिबळपटू व पालक उपस्थित होते. केन चेस अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक रोहित पोळ यांनी आभार मानले.
बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरचा अवनीश जितकर अजिंक्य
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
25.2
°
C
25.2
°
25.2
°
62 %
5.2kmh
0 %
Sun
25
°
Mon
27
°
Tue
27
°
Wed
26
°
Thu
26
°

