कोल्हापूर :
‘पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया’ (पीआरएसआय) या देशातील जनसंपर्क क्षेत्रातील शिखर संस्थेच्या कोल्हापूर चॅप्टरची स्थापना व कार्यकारणी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजित पाठक यांनी नुकतीच जाहीर केली आहे. नवीन कार्यकारणीत अध्यक्षपदी शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाच्या विभागप्रमुख व वरिष्ठ प्राध्यापक डॉ. निशा मुडे पवार, उपाध्यक्षपदी ‘नँक’चे सल्लागार डॉ. जगन्नाथ पाटील तर सचिवपदी महावितरणचे जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले यांची निवड झाली आहे. नवीन कार्यकारणीत सह सचिवपदी डॉ. अनुराधा इनामदार तर कोषाध्यक्षपदी तुतारी जाहिरात संस्थेचे प्रमुख सचिन मोरे यांची नियुक्ती झाली आहे.
समितीत सदस्य म्हणून वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रताप पाटील, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, जेष्ठ पत्रकार दशरथ पारेकर, जेष्ठ पत्रकार व दैनिक पुढारीचे निवासी संपादक राजेंद्रकुमार चौगुले, सोलापूर विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातील प्राध्यापक डॉ. अंबादास भास्के, कणेरी मठ कोल्हापूरचे विवेक सिद्ध यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
याचबरोबर कोल्हापूर चॅप्टरच्या सल्लागार समितीत महावितरणचे सेवानिवृत्त मुख्य जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील, मुख्यमंत्री कार्यालयाचे वरिष्ठ सहायक संचालक रवींद्र राऊत, रत्नागिरी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते व डॉ. शैलेंद्र सडोलीकर यांची तर विद्यार्थी नोंदणी समितीत अहमदनगर कॉलेजचे प्रा.डॉ. बापू चंदनशिवे, शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण विभागातील डॉ. नितीन रणदिवे, पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातील डॉ. वृषाली बर्गे, सोलापूर विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातील डॉ. तेजस्विनी कांबळे यांची नियुक्ती झाली आहे. तसेच प्रसिद्धी समितीत संवादतज्ञ चंद्रकांत कबाडे, लोकमतचे पत्रकार डॉ. शेखर वानखेडे, कृष्णा हॉस्पिटल कराडचे जनसंपर्क अधिकारी सुशील लाड व विवेक पोर्लेकर यांची नियुक्ती झाली आहे.
‘पीआरएसआय’ संस्था १९६६ पासून देशपातळीवर कार्यरत…
जनसंपर्क क्षेत्राचा विकास, जनसंपर्क क्षेत्राबद्दल समजात जागृती, जनसंपर्क मुल्यांची जोपासना, अनुभव आणि ज्ञानाचे आदान-प्रदान, जनसंपर्क क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, जनसंपर्क क्षेत्रातील चांगल्या कामाचा गौरव, जनसंपर्क क्षेत्रातील संशोधनास प्रोत्साहन, जनसंपर्काशी सबंधित विविध साहित्य प्रकाशित करणे इत्यादी विषयांवर पीआरएसआय ही संस्था भारतात १९६६ पासून कार्यरत आहे.
——————————
पीआरएसआय’चे कोल्हापूर चॅप्टर व कार्यकारिणी जाहीर
Mumbai
smoke
27
°
C
27
°
27
°
47 %
1.5kmh
0 %
Thu
27
°
Fri
28
°
Sat
27
°
Sun
27
°
Mon
27
°

