कोल्हापूर :
दुधाळी परिसरातील रस्त्यासाठी भाजपा उत्तरेश्वर मंडलने मंगळवारी रास्तारोको आंदोलन केले. आंदोलनस्थळी कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने ज्युनिअर इंजिनिअर मयुरी पटवेगार पटवेगार उपस्थित झाल्या. त्यावेळी त्यांना निवेदन देण्यात आले.
दुधाळी परिसरातील उत्तरेश्वर पेठ व रंकाळा टॉवर परिसरास जोडणारा, यंगटायगर ते महाराणा प्रताप हायस्कूल पर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. तो रस्ता व तिथे असणाऱ्या पुलाचे नूतनीकरण करून रस्ता नव्याने करावा, अशी मागणी भाजपा उत्तरेश्वर मंडलने वेळोवेळी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाला निवेदन देऊन केली होती. परंतु कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने याची दखल घेतली नाही. म्हणून मंगळवारी भाजपा उत्तरेश्वर मंडल व उत्तरेश्वर पेठेतील नागरिकांनी रास्तारोको आंदोलन केले. यावेळी महानगरपालिका प्रशासना विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. तसेच हा रस्ता लवकरात लवकर झाला नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा भाजपा उत्तरेश्वर मंडलचे अध्यक्ष सुनिल पाटील व विराज चिखलीकर यांनी यावेळी दिला.
आंदोलनस्थळी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने ज्युनिअर इंजिनिअर मयुरी पटवेगार उपस्थित झाल्या. त्यावेळी त्यांना तेथील रस्त्याची वस्तुस्थिती दाखवून निवेदन देण्यात आले. निवेदन स्वीकारल्यानंतर हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करू असे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
याप्रसंगी विराज चिखलीकर, सुनिल पाटील, भरत काळे, सुशांत पाटील, राजू माने, हेमंत कांदेकर, दीपक काटकर, अमेय भालकर, अनिकेत अतिग्रे, नरेश जाधव, राहुल घाडगे, विश्वजीत पवार, वल्लभ देसाई, रोहित कारंडे यांच्यासह भाजपाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपा उत्तरेश्वर मंडलकडून दुधाळी परिसरातील रस्त्यासाठी रस्तारोको
Mumbai
smoke
31
°
C
31
°
30.9
°
33 %
4.1kmh
20 %
Sun
30
°
Mon
28
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°

