कोल्हापूर :
जयपूर राजस्थान येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२५ मध्ये डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे खेळाडू अथर्व गंगाराम पाटील व रणवीर अजितसिंह काटकर यांनी १० मीटर एअर रायफल या प्रकारात कांस्य पदक पटकावले.
२४ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत जयपूर येथे खेलो इंडिया स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये १० मीटर एअर रायफल या प्रकारात सांघिक गटातून अथर्व गंगाराम पाटील, रणवीर अजितसिंह काटकर यांनी दमदार कामगिरी नोंदवत कांस्यपदक जिंकले. अथर्व पाटील हा सिव्हिलच्या तृतीय वर्षाचा तर रणवीर काटकर हा आर्किटेक्चर शाखेचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. त्यांना अधिष्ठाता आणि जिमखाना प्रमुख डॉ. राहुल पाटील, क्रीडा संचालक इजाज गडकरी यांचे मार्गदर्शन लाभले.
अथर्व व रणवीरने मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटी, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे यांनी अभिनंदन केले.
डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या दोघांना खेलो इंडियामध्ये कास्यपदक
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
31
°
C
31
°
30.9
°
29 %
2.6kmh
0 %
Mon
31
°
Tue
28
°
Wed
29
°
Thu
28
°
Fri
27
°

