Homeकला - क्रीडाशाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीगचा आज किक-ऑफ

शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीगचा आज किक-ऑफ

कोल्हापूर :
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीगचा सोमवारी (दि.१) किक-ऑफ होत आहे. वरिष्ठ गटातील या सन २०२५-२६च्या फुटबॉल हंगामाचा शुभारंभ होईल. छत्रपती शाहू स्टेडियमवर १ डिसेंबरला दुपारी १:३० वाजता संध्यामठ तरुण मंडळ विरुद्ध रंकाळा तालीम मंडळ तर दुपारी ४ वाजता पाटाकडील तालीम मंडळ (अ) विरुद्ध सम्राटनगर स्पोर्टस् या सामन्याने स्पर्धेचा किक-ऑफ होईल.
यामध्ये वरिष्ठ गटातील सोळा संघात साखळी स्पर्धा होईल. स्पर्धेत सिनिअर सुपर-८ आणि सिनिअर-८ अशा दोन गटांतर्गत एकूण सात फेऱ्यांमध्ये ५६ सामने खेळले जातील. सिनिअर सुपर- ८ आणि सिनिअर- ८ अशा दोन गटांतर्गत होणाऱ्या चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार याची चर्चा सुरू झाली आहे. लीग चॅम्पियन होण्यासाठी सिनिअर सुपर-८ गटात चुरस असेल. सर्वाधिक गुण मिळवणारा संघ ‘लीग चॅम्पियन’ ठरेल.
शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेतील सामने छत्रपती शाहू स्टेडियमवर होतील. दररोज दोन सामने खेळले जातील. पहिला सामना दुपारी १:३० वाजता तर दुसरा सामना दुपारी ४ वाजता सुरू होईल. पहिल्या फेरीतील सामने पुढीलप्रमाणे आहेत.
• १ डिसेंबर : संध्यामठ – रंकाळा
पाटाकडील (अ) – सम्राटनगर
• २ डिसेंबर : झुंजार क्लब – सुभाषनगर
खंडोबा – बालगोपाल
• ३ डिसेंबर : फुलेवाडी – प्रॅक्टीस क्लब
शिवाजी – वेताळमाळ
• ४ डिसेंबर : उत्तरेश्वर – पाटाकडील (ब)
जुना बुधवार – दिलबहार

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
31 ° C
31 °
30.9 °
29 %
2.6kmh
0 %
Mon
31 °
Tue
28 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
27 °

Most Popular

You cannot copy content of this page