Homeशैक्षणिक - उद्योग पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये डान्स प्रशिक्षण 

पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये डान्स प्रशिक्षण 

इंग्लंडचे प्रसिद्ध डान्सर कॅरन ले यांची स्कूलला भेट
कोल्हापूर :
येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये नृत्यकलेचा एक भव्य, मनोहारी आणि उत्साहपूर्ण सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. इंग्लंडमधील प्रसिध्द डान्सर कॅरन ले तसेच ‘पोदार एनरिचमेंट अकॅडमीच्या प्रमुख श्रीमती ज्योती गाला यांच्या विशेष उपस्थितीमुळे संपूर्ण शाळेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कॅरन हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुप्रसिध्द डान्सर असून जगभरातील विविध नृत्य शैलींचा त्यांनी सखोल अभ्यास केलेला आहे. पॉपिंग वेव्हिग आणि टटिंग अशा विविध नृत्यशैलीत त्यांचा हातखंडा आहे. तसेच देश-विदेशातील विविध शाळा व कॉलेजमधील विद्यार्थ्यांना व तरुणांना ते नृत्याचे धडे देत आहेत. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ब्रिटन्स गॉट टॅलेंट या नृत्य स्पर्धेत सहभागी होऊन त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. तसेच गेली १७ वर्षे ते नृत्य प्रशिक्षणाचे काम करत आहे. अशा हरहुन्नरी कलाकाराला भेटणे हे ‘पोदार कोल्हापूर च्या विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणीच होती. कॅरनची ही भेट अत्यंत उत्साहपूर्ण व आगळीवेगळी ठरली.
कॅरन ले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत नृत्यकलेतील विविध अंगांची ओळख करून दिली. ताल, लय, शरीरस्थिती, अभिव्यक्ती यांसारख्या घटकांचे त्यांनी सोप्या भाषेत केलेले मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले. थेट अशा दर्जेदार कलाकाराकडून शिकण्याची संधी ही विद्यार्थ्यांच्या जीवनातील अमूल्य आठवण ठरेल.
या कार्यक्रमास शाळेतील १,५०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. त्यांच्यासाठी विविध सत्रे आयोजित करण्यात आली. एकूण ५ सत्र घेऊन कॅरन ले यांनी विविध नृत्याविष्कार विद्यार्थ्यांना शिकवले. तसेच प्रश्न उत्तर सत्र घेऊन मुलांना मार्गदर्शन केले. यामधून निवडलेल्या १०० विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रात्यक्षिक प्रशिक्षण सत्र घेण्यात आले.
या उपक्रमाचे सुयोग्य नियोजन मुख्याध्यापिका शिल्पा कपूर आणि उप-प्राचार्या श्रीमती मनीषा आंब्राळे यांनी केले. तसेच विशेष उपस्थिती व मार्गदर्शन श्रीमती ज्योती गाला यांचे लाभले.
या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये नृत्यकला, सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि जागतिक कला मानदंडांविषयीचे ज्ञान समृद्ध झाले आहे. तसेच ‘पोदार’मधील विद्यार्थ्यांना सुरेश वाडकर यांचे आजिवासन संस्थेतर्फे गायनाचे मार्गदर्शनही दिले जाते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तेजन मिळावे यासाठी शाळा नेहमीच प्रयत्न करत असते. शाळा व्यवस्थापनाने अशाप्रकारचे उपक्रम पुढेही सातत्याने आयोजित करण्याची ग्वाही दिली.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
haze
26 ° C
26 °
26 °
65 %
1.5kmh
0 %
Fri
29 °
Sat
28 °
Sun
28 °
Mon
27 °
Tue
27 °

Most Popular

You cannot copy content of this page