Homeकला - क्रीडामहाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी आमदार डॉ. परिणय फुके

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी आमदार डॉ. परिणय फुके

निरंजन गोडबोले सचिव तर कोल्हापूरचे भरत चौगुले खजिनदार
कोल्हापूर:
महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी गोंदियाचे आमदार व माजी मंत्री डॉ. परिणय फुके, सचिवपदी पुण्याचे निरंजन गोडबोले, कार्याध्यक्षपदी जळगावचे सिद्धार्थ मयूर व खजिनदारपदी कोल्हापूरचे भरत चौगुले यांची बिनविरोध निवड झाली.
जळगावमध्ये महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ मयूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत २०२५ ते २८ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी ही निवड करण्यात आली.
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे माजी अध्यक्ष अशोक जैन (जळगाव) यांच्या व सर्व जिल्ह्याच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत झालेल्या या सभेचे निवडणूक अधिकारी म्हणून अँड. चंद्रशेखर जामदार यांनी काम पाहिले तर अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष अनिल कुमार रायझदा (लखनऊ) हे निरीक्षक म्हणून आले होते. यामध्ये अकरा पैकी दहा जागी बिनविरोध निवड झाली आहे.
यावेळी नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. अध्यक्ष – आमदार डॉ. परिणय फुके (गोंदिया), कार्यकारी अध्यक्ष – सिद्धार्थ मयूर (जळगाव), सचिव – निरंजन गोडबोले (पुणे), खजिनदार – आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले (कोल्हापूर), उपाध्यक्ष – सुनील रायसोनी (नागपूर), चिदंबर कोटीभास्कर (सांगली) व श्रीराम खरे (रत्नागिरी), सहसचिव – अश्विन मुसळे (चंद्रपूर), डॉ. दीपक तांडेल (ठाणे) व सतीश ठाकूर (जालना).
खेळाडू प्रतिनिधी : ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे (पुणे), ग्रँडमास्टर विदीत गुजराथी (नाशिक), महिला ग्रँडमस्टर स्वाती घाटे (पुणे) व सौम्या स्वामीनाथन (पुणे). स्वीकृत सदस्य : उपाध्यक्ष – राजेंद्र कोंडे (पुणे), सहसचिव – अंकुश रक्ताडे (बुलढाणा) व रवी धर्माधिकारी (जळगाव).
दरम्यान, आंतरराष्ट्रीय पंच व चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष भरत चौगुले यांची महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचा खजिनदार म्हणून नियुक्त होण्यासाठी नाम. चंद्रकांतदादा पाटील, खा. धनंजय महाडिक, कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष प्रा. अरूण मराठे, डॉ. गुणवंत शहा, राजाभाऊ शिरगावकर, सौ.मधुरिमाराजे छत्रपती, विश्वविजय खानविलकर, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे माजी उपाध्यक्ष गिरीश चितळे, कॅप्टन उत्तम पाटील, चेस असोसिएशन कोल्हापूरचे सचिव फिडे इन्स्ट्रक्टर मनिष मारुलकर, उपाध्यक्ष धीरज वैद्य, ॲड. अजित कुलकर्णी, धनंजय इनामदार, अनिल राजे, प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे, प्रितम घोडके, कॅंडिडेट मास्टर अनिश गांधी, आंतरराष्ट्रीय मास्टर सम्मेद शेटे या सर्वांचे पाठबळ, प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES
Mumbai
haze
26 ° C
26 °
26 °
65 %
1.5kmh
0 %
Fri
29 °
Sat
28 °
Sun
28 °
Mon
27 °
Tue
27 °

Most Popular

You cannot copy content of this page