कोल्हापूर :
ऐम टेनिस अकादमी आयोजित व एआयटीए, एमएसएलटीए, पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए – नवसह्याद्री क्रीडा संकुल अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशीप सिरीज (१६ वर्षाखालील) टेनिस स्पर्धेत स्मित उंद्रे, अर्चन पाठक, स्वरा जावळे, नवल शेख यांनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत विजयाचा शुभारंभ केला. यासह त्यांनी दुसरी फेरी गाठली.
स्पर्धेचे उदघाटन पीसीएमसीचे कमिशनर आणि महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हार्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नवसह्याद्री क्रीडा संकुलाचे उमेश भिडे, जयंत भावे, नितीन देवळीकर, मिलिंद जोगळेकर, शेपिंग चॅम्पियन पुणे फाऊंडेशनच्या केतकी जोगळेकर आणि सारिका गडदे, अनया थोरात, अव्यक्ता थोरात, एआयटीए सुपरवायझर प्रवीण झिटे आदी उपस्थित होते.
पुणे येथील नवसह्याद्री क्रीडा संकुल टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये पहिल्या फेरीत मुलांच्या गटात स्मित उंद्रे याने तिसऱ्या मानांकित विवान मल्होत्राचा ६-२, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव करून अनपेक्षित निकालाची नोंद केली. बिगर मानांकित अर्चन पाठकने सहाव्या मानांकित आदित्य योगीचा ४-६, ६-२, ६-१ असा तीन सेटमध्ये पराभव केला. अव्वल मानांकित आर्यन कीर्तने याने कियान पौआचा ६-०, ६-१ असा तर, अथर्व येलभर याने सौमित्र किर्दतचा ६-३, ६-३ असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.
मुलींच्या गटात पुण्याच्या स्वरा जावळे हिने चौथ्या मानांकित आपली शहर सहकारी शर्मिष्ठा कोद्रेचा ६-२, ६-० असा पराभव केला. बिगर मानांकित नवल शेखने तिसऱ्या मानांकित साराह हकीमवर ६-०, ६-२ असा विजय मिळवला.
——————————————————-
स्मित उंद्रे, अर्चन पाठक, स्वरा जावळे, नवल शेख यांचा विजयी शुभारंभ
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
29
°
C
29
°
29
°
61 %
2.6kmh
6 %
Mon
28
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°
Fri
28
°

