Homeकला - क्रीडाशिवनेरी'ने जिंकली सोमाणी ट्रॉफी

शिवनेरी’ने जिंकली सोमाणी ट्रॉफी

• आदर्श रावळ व आदित्य जाधव यांना विभागून मालिकावीर पुरस्कार
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित व टेक्नोमेट एंटरप्रायझेस पुरस्कृत कै. मुरलीधर सोमाणी ट्राॅफी १९ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत शिवनेरी क्रिकेट क्लबने विजेतेपद पटकावले. शिवनेरी क्रिकेट क्लबने ईगल क्रिकेट ॲकॅडमीवर ५ गडी राखून विजेतेपद मिळविले.
स्पर्धेतील मालिकावीर पुरस्कार आदर्श रावळ (शिवनेरी) व आदित्य जाधव (ईगल) यांना विभागून देण्यात आला. तसेच अंतिम सामन्यातील उत्कृष्ट फलदांज आदित्य जाधव (ईगल) आणि उत्कृष्ट गोलदांज म्हणून प्रथमेश हेंगाणा (शिवनेरी) यांना गौरविण्यात आले.
येथील राजाराम काॅलेज मैदानावर कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित व टेक्नोमेट एंटरप्रायझेस पुरस्कृत कै. मुरलीधर सोमाणी ट्राॅफी १९ वर्षाखालील दोनदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना (तीन दिवसीय) ईगल क्रिकेट ॲकॅडमी विरूध्द शिवनेरी क्रिकट क्लब यांच्यात झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ईगल क्रिकेट ॲकॅडमीने पहिल्या डावात ४२.३ षटकांत सर्वबाद १३३ धावा केल्या. यामध्ये किशोर भोसले ५३, सुयश लाड नाबाद २०, श्रवण देसाई १५ धावा केल्या. शिवनेरी क्रिकेट क्लबकडून प्रथमेश हेंगाणा ६ तर आदर्श रावळने ३ बळी घेतले. शिवराज जगतापने १ बळी घेतला.
शिवनेरी क्रिकेट क्लबने पहिल्या डावात ५७.५ षटकांत सर्वबाद १९६ धावा केल्या. यामध्ये विरेन पाटील ७७, आर्यन कित्तुरे ४८, हर्षद कुंभोजे २३ व आदर्श रावळ ११ धावा केल्या. ईगल क्रिकेटकडुन वेदांत पाटीलने ४, तेजस रोकडे व सुयश लाड यांनी प्रत्येकी २, विश्वराज डंबेने १ बळी घेतला. अशाप्रकारे शिवनेरी क्रिकेट क्लबने पहिल्या डावात ६३ धावांची निसटती आघाडी घेतली.
ईगल क्रिकेट ॲकॅडमीने दुस­ऱ्या डावात ७६.२ षटकांत सर्वबाद २१० धावा केल्या. यामध्ये आदित्य जाधव ११८, आराध्य खांबे १७, श्रवण देसाई व तेजस रोकडे प्रत्येकी १३, सिध्दार्थ कुंभार १२ धावा केल्या. शिवनेरी क्रिकेट क्लबकडून दुस­ऱ्या डावात प्रथमेश हेंगाणाने ३, आदर्श रावळ, ओम पाटील, शिवराज जगताप यांनी प्रत्येकी २ बळी तर प्रेम पाटीलने १ बळी घेतला.
शिवनेरी क्रिकेट क्लबला विजयासाठी १४७ धावांची गरज होती. ती शिवनेरी क्रिकेट क्लबने दुस­ऱ्या डावात २७.३ षटकांत ५ बाद १५१ धावा केल्या. यामध्ये आर्यन कित्तुरे ५६, हर्षद कुंभोजे २७, आदर्श रावळ २३, शिवराज जगताप नाबाद २२ धावा केल्या. ईगल क्रिकेट ॲकॅडमीकडून तेजस रोकडेने ३ बळी घेतले. तर मंथन पाटील व सिध्दार्थ कुंभार यांनी प्रत्येकी १ बळी घेतले. अशाप्रकारे शिवनेरी क्रिकेट क्लबने ५ गडी राखून विजय मिळवत १९ वर्षाखालील कै. मुरलीधर सोमाणी ट्राॅफी पटकावली.
        —————-
विजयी संघ असा- आदर्श रावळ (कर्णधार), आर्यन कित्तुरे, हर्षद कुंभोजे, ओम पाटील, प्रथमेश हेंगाणा, प्रेम पाटील, शिवराज जगताप, सुजल मोर्या, विरेन पाटील, यश टेके, श्रीजीत काळे, अजिंक्य गांधी. संघ व्यवस्थापक प्रसाद उगवे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30 ° C
30 °
27.9 °
54 %
3.6kmh
1 %
Mon
29 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °

Most Popular

You cannot copy content of this page