Homeशैक्षणिक - उद्योग प्रभावी शिक्षणासाठी एआय तंत्रज्ञानाचा योग्य वापर आवश्यक : डॉ. सचिन पाटील

प्रभावी शिक्षणासाठी एआय तंत्रज्ञानाचा योग्य वापर आवश्यक : डॉ. सचिन पाटील

कोल्हापूर :
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार Blended Teaching & Learning, Flipped Classroom यासारख्या शैक्षणिक सुविधांची आवश्यकता आहे.  त्याकरीता ए.आय. तंत्रज्ञानाचा प्रभावी शिक्षणासाठी योग्य वापर होणे आवश्यक आहे. शिक्षणपध्दतीमध्ये आमुलाग्र बदल होत आहेत. काळानुरुप शिक्षक व विद्यार्थी यांनी सुध्दा बदलत्या शिक्षणपध्द्तीमध्ये ए.आय. तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राजारामबापू इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीचे, इस्लामपूर येथील संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ. सचिन पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात होते.
डॉ. सचिन पाटील हे विवेकानंद महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागातर्फे AI Powered Teaching & Learning : Aligning with NEP 2020 या विषयावरील कार्यशाळा अग्रणी महाविद्यालय योजना (न्यू कॉलेज क्लस्टर) अंतर्गत आयोजित कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. दुपारच्या सत्रात सायबर कॉलेजच्या डॉ. रजनी कामत यांनी E Learning या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत अग्रणी महाविद्यालय कार्यशाळा समन्वयक प्रा. डॉ. इरफान मुजावर यांनी केले. आभार संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ. विशाल वाघमारे यांनी मानले.
या कार्यशाळेस अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत (न्यू कॉलेज क्लस्टर) असलेल्या महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात, आयक्यूएसी समन्वयक डॉ. श्रुती जोशी, डॉ. राजश्री पाटील, प्रा. महेश पाटील, प्रा. शुभांगी बैस, प्रा. सोनल औंधकर, प्रा. निकीता हुडे, प्रा. मनिषा दबडे, तसेच रजिस्ट्रार एस. के. धनवडे व प्रशासकीय कर्मचारी यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30 ° C
30 °
27.9 °
54 %
3.6kmh
1 %
Mon
29 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °

Most Popular

You cannot copy content of this page