Homeकला - क्रीडासांगली चॅम्प्सची अंतिम फेरीत धडक

सांगली चॅम्प्सची अंतिम फेरीत धडक

कोल्हापूर :
मयूर स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कुमुद गयावळ महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात सांगली चॅम्प्सने सेंच्युरीयन क्रिकेट अकॅडमीचा १२६ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.
भाऊराव पाटील क्रीडांगणावर सुरू असलेल्या स्पर्धेतील सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत असताना सांगली चॅम्प्सने ३५ षटकांत ५ बाद २५० धावा केल्या. यामध्ये कृषी ठक्कर ६६, श्रेया जेऊर नाबाद ६६, सरस्वती कोकरे ४९, रितू जमादार २२ धावा केल्या. सेंच्युरीयन क्रिकेट अकॅडमीकडून हमत शिवणकर व प्रांजल चौगुले प्रत्येकी २ बळी तर पवित्रा महाडिकने १ बळी घेतला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना  सेंच्युरियन क्रिकेट अकॅडमीने ३१.२ षटकांमध्ये सर्वबाद १२४ धावा केल्या. यामध्ये पवित्रा महाडिक १७, साक्षी पोद्दार १५ धावा केल्या. सांगली चॅम्प्सकडून श्रेया पाटील ३, अर्पिता नायकवडी २, पलक कोडक व स्नेहल टकले यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. अशाप्रकारे सांगली चॅम्प्सने १२६ धावांनी सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
24 ° C
24 °
24 °
50 %
2.6kmh
0 %
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page