Homeकला - क्रीडासमिट ॲडव्हेंचर्सच्या १७ जणांची एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहीम यशस्वी

समिट ॲडव्हेंचर्सच्या १७ जणांची एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहीम यशस्वी

• संयोगिता पाटील आणि तिच्या शिष्यांनी दिली भरतनाट्यमने एव्हरेस्टला मानवंदना
कोल्हापूर :
समिट ॲडव्हेंचर्सच्या १७ जणांची एव्हरेस्ट बेस कॅम्प-काला पत्थर मोहीम फत्ते झाली. यावेळी संयोगिता पाटील आणि तिच्या तीन शिष्यांनी भरतनाट्यमने एव्हरेस्टला मानवंदना दिली. समिटची ही यशस्वी मोहीम गिर्यारोहिका खुशी कांबोज यांच्या नेतृत्वाखाली आणि विनोद कांबोज यांच्या मार्गदर्शनाने यशस्वी झाली.
कोल्हापूरमधून पहिल्यांदाच १७ जणांचा चमू एव्हरेस्ट बेस कॅम्प (१७,६५० फूट) आणि काला पत्थर (१८,२०० फूट) मोहिमेसाठी २३ ऑक्टोबर रोजी रवाना झाला होता. या मोहिमेचे एक वेगळे ध्येय होते. ते म्हणजे थेँगबोचे मॉनेस्ट्री (१३,००० फूट), एव्हरेस्ट बेस कॅम्प (१७,६५० फूट) आणि काला पत्थर (१८,२०० फूट) या ठिकाणी भरतनाट्यम सादर करून एव्हरेस्टला मानवंदना देणे.
२६ ऑक्टोबरला लुक्ला येथून ट्रेकला सुरुवात झाली. ट्रेकचा पहिला दिवस उत्तम वातावरणात पार पडला. सतत कोसळणाऱ्या पावसात आणि गोठवणाऱ्या थंडीत ट्रेक करावा लागला. याच दरम्यान खुम्बू व्हॅलीमधील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध अशा थेँगबोचे मॉनेस्ट्रीसमोर भर पावसात भरतनाट्यमची पहिली वंदना सादर करण्यात आली. लुक्ला येथून ९,००० फुटांवरून ट्रेकला सुरुवात करून भर पावसात पाचव्या दिवशी डिंगबोचे येथे १४,६०० उंचीवर येऊन पोहोचलो होतो.
ऑक्टोबरच्या शेवटी व नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यादरम्यान अनपेक्षित असा पाऊस झाला आणि १३,००० फुटांपासून वरती प्रचंड स्नो फॉल झाला होता. डिंगबोचे येथे तापमान उणे १० अंश झाले होते. सतत पाच दिवस झालेल्या बर्फवृष्टीमुळे चालणे अत्यंत जिकिरीचे आणि दमछाक करणारे झाले होते. डिंगबोचे ते लोबूचे, लोबूचे ते गोरखशेप, तेथून बेस कॅम्प, काला पत्थर आणि पुन्हा परतीचा ट्रेक हा संपूर्ण बर्फातून होणार होता.
दुर्दम्य इच्छाशक्ती आणि उत्कृष्ट टीमवर्कचा समन्वय साधत, संपूर्ण ग्रुप शेवटचा कॅम्प गोरखशेप येथे ३ नोव्हेंबरला पोहोचला. दुपारी दोन वाजता काला पत्थरची चढाई सुरू केली. सर्वांच्यासोबत संयोगिता पाटील, दिव्या वारके, मिताली महाराज आणि प्रांजल दळवी या भरतनाट्यमच्या पेहरावात आणि साज-शृंगारात चढाई करत होत्या. मावळत्या सूर्याच्या साक्षीने सुवर्णांकित झालेल्या एव्हरेस्टसमोर, काला पत्थरच्या शिखरापासून थोड्या खाली, जिथे नृत्यासाठी जागा होती, तिथे या चौघींनी उणे ८ अंश तापमानात, बर्फावर बूट काढून भरतनाट्यम सादर करून एव्हरेस्टला मानवंदना दिली. संपूर्ण टीमच्या साथीने १८,२०० फूट उंचीवर, एव्हरेस्टने पहिल्यांदाच अशी मानवंदना स्वीकारली. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मावळत्या सूर्यासोबत उगवत्या चंद्रानेसुद्धा एव्हरेस्टसोबत हजेरी लावली होती.
शेवटचा आणि महत्त्वाचा मोहिमेचा टप्पा ४ नोव्हेंबरला सकाळी गोरखशेपवरून बेस कॅम्पला जाऊन मोहिमेची सांगता करणे हा होता. साधारण तीन तास ट्रेक करून सर्वजण साडेनऊच्या आसपास बेस कॅम्पला पोहोचले. १८ वर्षांच्या प्रांजलपासून ६३ वर्षांच्या अभय देशपांडे यांच्यापर्यंत सर्व टीम बेस कॅम्पला पोहोचली होती. सर्वांचे उद्दिष्ट सफल झाले होते. त्याचवेळी तिसऱ्या मानवंदनेची सुरुवात झाली. नृत्य विशारद, गिनीज रेकॉर्ड प्राप्त संयोगिता पाटीलसह तिच्या शिष्या दिव्या वारके, मिताली महाराज आणि प्रांजल दळवी यांनी १७,७०० फुटांवर भरतनाट्यमने तिथे आलेल्या जगभरातील ट्रेकर्सना मंत्रमुग्ध केले.
हे यश संपादित करण्यासाठी समिटच्या सर्व टीमने, तसेच ॲस्टर आधारचे डॉ. शैलेंद्र नवरे, डॉ. अमोल कोडोलीकर, सिग्मा हॉस्पिटलचे डॉ. प्रदीप पाटील, त्यांची कन्या सई पाटील, डॉ. सुमती कुलकर्णी, डॉ. अनिता कदम, न्यायाधीश (निवृत्त) वंदना तेंडुलकर, अश्वता विधाते आणि उद्योगपती अभय देशपांडे, संग्राम शेवरे, राजेंद्र पाटील यांनी ही मह

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
27 ° C
27 °
27 °
47 %
3.6kmh
0 %
Mon
27 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °
Fri
29 °

Most Popular

You cannot copy content of this page