कोल्हापूर :
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) आणि कोल्हापूर जिल्हा लॉन टेनिस संघटना (केडीएलटीए) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २०व्या रमेश देसाई मेमोरियल नॅशनल ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत नमिश हूड, नील केळकर, रित्सा कोंडकर, प्रार्थना खेडकर, जान्हवी चौघुले, आरोही देशमुख, श्रावी देवरे या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली.
येथील केडीएलटीए टेनिस संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये दुसऱ्या फेरीत मुलांच्या गटात क्वालिफायर महाराष्ट्राच्या नमिश हूड याने चौदाव्या मानांकित दिल्लीच्या लक्ष्य डरालचा ७-५, ६-३ असा तर, तामिळनाडूच्या हेमदेव महेश याने पंधराव्या मानांकित कर्नाटकाच्या इशाय्यू देसाईचा ६-२, ६-२ असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. महाराष्ट्राच्या नील केळकर याने काल मानांकित खेळाडूवर विजय मिळवणाऱ्या वरद पोळचा ६-१, ०-६, ६-१ असा तीन सेटमध्ये पराभव केला. चुरशीच्या लढतीत पश्चिम बंगालच्या अकराव्या मानांकित संकल्प सहानीने महाराष्ट्राच्या आरव पटेलचा ६-२, ६-७(४), ६-३ असा कडवा प्रतिकार केला.
मुलींच्या गटात पहिल्या फेरीत पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या महाराष्ट्राच्या रित्सा कोंडकरने तामिळनाडूच्या दिया हरिकृष्णनचा ६-२, ६-२ असा सहज पराभव केला. श्रेया पठारे हिने शौर्या पाटीलवर ७-५, ६-१ असा विजय मिळवला. महाराष्ट्राच्या प्रार्थना खेडकरने कर्नाटकच्या धनवी कांजीतंडा बोपण्णाचे आव्हान ६-३, ६-२ असे मोडीत काढले. महाराष्ट्राच्या जान्हवी चौघुलेने कर्नाटकच्या आयलिन कॉर्नेलोचा टायब्रेकमध्ये ७-६(३), ६-० असा तर, आरोही देशमुखने शर्मिष्ठा कोद्रेचा ६-२, ६-३ असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. महाराष्ट्राच्या श्रावी देवरेने तेलंगणाच्या सानिध्या कारंतोथचा ६-२, ६-१ असा पराभव केला.
——————————————————-
टेनिस स्पर्धेत रित्सा, प्रार्थना, जान्हवी, आरोही, श्रावी यांची आगेकूच
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
27
°
C
27
°
27
°
47 %
3.6kmh
0 %
Mon
27
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°
Fri
29
°

