Homeसामाजिकक्षयमुक्त कोल्हापूरला प्राधान्य देणार : जिल्हाधिकारी अमोल येडगे

क्षयमुक्त कोल्हापूरला प्राधान्य देणार : जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर :
कोल्हापूरने राज्यात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता क्षयमुक्त कोल्हापूरसाठी नागरिकांनी आपले योगदान द्यावे, तसेच क्षयमुक्त कोल्हापूरला आपण प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘निक्षय गीत मैफिल’च्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकीयेन. एस, ज्येष्ठ वास्तुविशारद शिरीष बेरी, शर्मिला मोहिते, चारुदत्त जोशी,मिलिंद नाईक, प्रशांत जोशी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले की, क्षयरोग पसरू नये याची नागरिकांनी दक्षता घ्यावी तसेच घाबरून जावू नये. प्रशांत जोशी यांनी त्यांच्या संस्थेमार्फत क्षयरोग मुक्तीसाठी केलेल्या प्रयत्नांची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.
यावेळी जिल्हाधिकारी व कार्तिकीयेन एस. यांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात तीन क्षयरुग्णांना पोषण आहार किट देण्यात आले. संगीताच्या सुरांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने जाणीव फौंडेशन, यमुनाताई पाटील चॅरिटेबल ट्रस्ट  आणि प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा क्षयरोग उपकेंद्र कोल्हापूर यांच्या सहकार्याने शब्दयोगी दिवगंत कवयित्री शांता शेळके यांच्या सुश्राव्य गीतांची १४०वी ‘निक्षय गीत मैफल’ राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आली होती.
या मैफिलीच्या आयोजनातून जो ऐच्छिक निधी जमा होतो, त्या निधीतून क्षय रुग्णांना उपचाराच्या अनुषंगाने मदत केली जाते. या गीत गायन मैफलीसाठी अमरसिंह राजपूत, गणेश जाधव, प्रिती देसाई, प्रसन्न कुलकर्णी, मंजिरी लाटकर, नीलंबरी जाधव, जयश्री देसाई यांनी आपल्या सुश्राव्य गायनाने शब्दयोगी श्रीमती शांताबाई शेळके यांच्या रचनांना पुरेपूर न्याय दिला. यावेळी तितकेच रसाळ निवेदन अश्विनी टेंबे यांनी केले. या कार्यक्रमासाठी रसिक प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
31 ° C
31 °
29.9 °
27 %
3.1kmh
2 %
Tue
29 °
Wed
27 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °

Most Popular

You cannot copy content of this page