Homeशैक्षणिक - उद्योग १०वी आणि १२वी परीक्षा वेळापत्रक जाहीर

१०वी आणि १२वी परीक्षा वेळापत्रक जाहीर

कोल्हापूर :
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२वी) लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारी- मार्च २०२६६ साठी विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात आले असून सविस्तर वेळापत्र मंडळाच्या  www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर दि. ३१ ऑक्टोबर २०२५ पासून उपलब्ध करुन देण्यात आले असल्याची माहिती पुणे राज्यमंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२वी) लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी पुढीलप्रमाणे आहे. माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १०वी) ची परीक्षा शुक्रवार, दिनांक २० फेब्रुवारी २०२६ ते बुधवार, दिनांक १८ मार्च २०२६ पर्यंत असून प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा (शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह) ही दिनांक २ फेब्रुवारी २०२६ ते दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत असणार आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२वी) ची  परीक्षा (सर्वसाधारण, व्दिलक्षी व व्यवसाय अभ्यासक्रम तसेच माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांची ऑनलाईन परीक्षा) ही मंगळवार, दिनांक १० फेब्रुवारी २०२६ ते बुधवार दिनांक १८ मार्च २०२६ पर्यंत असून प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच NSQF अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा (माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह)- शुक्रवार दिनांक २३ जानेवारी २०२६ ते सोमवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ पर्यंत असणार आहे.
मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/ उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरुपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल त्या छापील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच सोशल मीडिया या किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरु नये. यामुळे विद्यार्थ्याचे नुकसान झाल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही, याची नोंद घ्यावी.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
25 ° C
25 °
25 °
50 %
2.6kmh
0 %
Tue
25 °
Wed
27 °
Thu
29 °
Fri
29 °
Sat
28 °

Most Popular

You cannot copy content of this page