कोल्हापूर :
महाराष्ट्राच्या महिला संघाने इतिहास घडवित बीसीसीआय महिला वरिष्ठ टी-२० ट्रॉफी २०२५चे विजेतेपद पटकावले. सुरत येथील लालभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने मध्य प्रदेशवर १२ धावांनी मात केली.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) तर्फे दरवर्षी आयोजित केली जाणारी महिला वरिष्ठ टी-२० ट्रॉफी ही भारतातील अग्रगण्य घरेलू स्पर्धांपैकी एक स्पर्धा आहे. महाराष्ट्र संघाने या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करत, पहिल्याच वेळेस विजेतेपद आपल्या नावे केले.
पावसामुळे १४ षटकांपर्यंत मर्यादित झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने १०२/९ अशी धावसंख्या उभारली. तेजल हसबनीस (३० धावा, २४ चेंडू) आणि गौतमी नाईक (२२ धावा, १७ चेंडू) यांनी स्थिर भागीदारी देत संघाला चांगली सुरुवात करून दिली. कर्णधार अनुजा पाटील (१२) आणि श्वेता माने (२१) यांनीही संघाच्या धावसंख्येत महत्त्वपूर्ण भर घातली.
प्रत्युत्तरात मध्यप्रदेशच्या संघाने १४ षटकांत ९०/९ एवढ्याच धावा केल्या. महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली. इशिता खळे (३/१७) आणि भक्ती मिरजकर (३/१९) यांनी निर्णायक भूमिका बजावत विजय निश्चित केला. या विजयाने महाराष्ट्राच्या महिला क्रिकेटच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला असून, संघाचे संयम, तयारी आणि संघभावनेचे हे यशस्वी फळ आहे.
              ———
विजेत्या संघाला एमसीएकडून ४० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर…
या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) चे अध्यक्ष रोहित पवार यांनी महाराष्ट्र महिला संघासाठी ४० लाख रुपयांच्या रोख बक्षिसाची घोषणा केली आहे. बीसीसीआयकडून विजेत्या संघाला मिळणाऱ्या ४० लाख रुपयांच्या बक्षिसासह, महाराष्ट्र संघाला एकूण ८० लाख रुपयांचे पारितोषिक प्राप्त होणार आहे.
महाराष्ट्राने पटकावले महिला वरिष्ठ टी-२० ट्रॉफीचे विजेतेपद
RELATED ARTICLES
Mumbai
			mist
			
		
					26
					°
					C
				
				
						
						26
						°
					
					
						
						26
						°
					
				
					
					94						%
				
				
					
					0kmh
				
				
					
					40						%
				
			Tue
						
							27
							°
						
					Wed
						
							27
							°
						
					Thu
						
							27
							°
						
					Fri
						
							28
							°
						
					Sat
						
							28
							°
						
					
                                    