• कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विक्रमी २० लाख २८ हजार लिटर्स दूध विक्री
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) ने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दूध विक्रीत नवा उच्चांक प्रस्थापित केला. यादिवशी तब्बल २० लाख २८ हजार ५२६ लिटर दूध विक्री करून विक्रमी कामगिरी नोंदवली.
यावेळी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले की, गोकुळने आपल्या उच्च गुणवत्तेच्या व विश्वासार्हतेच्या जोरावर ग्राहकांची मन जिंकली आहेत. ग्राहकांचा विश्वास आणि दूध उत्पादकांचा सहभाग हाच आमच्या प्रगतीचा पाया आहे. भविष्यात दररोज २० लाख लिटर दूध विक्रीचे उद्दिष्ट ठेवून आम्ही वाटचाल करत आहोत. ते पुढे म्हणाले की, आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तूप, श्रीखंड, बासुंदी, पनीर, लोणी, पेढा यासारख्या दुग्धजन्य उत्पादनांच्या विक्रीत मोठी वाढ करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या यशामध्ये दूध उत्पादक, संस्था, ग्राहक, वितरक, कर्मचारी आणि वाहतूक ठेकेदार यांचे सहकार्य मोलाचे असल्याचे नविद मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
गतवर्षी कोजागिरी पौर्णिमेदिवशी गोकुळने १८ लाख ६४ हजार ७५९ लिटर दूध विक्री केली होती, तर यंदा विक्रीत तब्बल १ लाख ६३ हजार ७६७ लिटरने वाढ झाली आहे.
या विक्रमी दूध विक्रीत संघाच्या मार्केटिंग विभागाने अत्यंत प्रभावी नियोजन आणि अमंलबजावणी केली असून याबद्दल डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील, विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
‘गोकुळ’च्या दूध विक्रीचा नवा उच्चांक!
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
28
°
C
28
°
28
°
39 %
2.6kmh
0 %
Wed
28
°
Thu
28
°
Fri
27
°
Sat
27
°
Sun
28
°

