Homeशैक्षणिक - उद्योग डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळेच १०० टक्के प्रवेश

डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळेच १०० टक्के प्रवेश

• विश्वस्त ऋतुराज पाटील यांचे प्रतिपादन
कोल्हापूर : 
डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळेच १०० टक्के प्रवेश झाले आहेत. आमच्या संस्थेबद्दल विद्यार्थी आणि पालकांच्या मनात असलेली विश्वासार्हता यामुळे अधोरेखित झाली असून हाच विश्वास आणखी वाढवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करूया, असे प्रतिपादन डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी केले. डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सर्वाधिक गुण मिळवून प्रवेश घेणाऱ्या सत्यम गायकवाड, शताक्षी शिंदे, आयुष चाळके, पार्थ शेलार, चैत्राली चौगले व अजित भवड या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक १०० टक्के प्रवेश झाले आहेत. दहावीमध्ये चांगले गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निकला पसंती दिली असून या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. महादेव नरके यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य डॉ. महादेव नरके  म्हणाले, पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियाबाबत सर्व स्टाफकडून अचूक मार्गदर्शन केले जाते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील यांच्या पाठबळामुळे वर्षभर विद्यार्थ्यांसाठी ज्या ज्या गोष्टी आम्ही करतो त्याची पोहचपावती १०० टक्के ॲडमिशनमधून मिळाली आहे.
यावेळी कार्यक्रमाला कार्यकारी संचालक ए. के. गुप्ता, उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेणके, डॉ. पी. के. शिंदे, प्रा. अक्षय करपे, प्रा. सुजाता शिंदे, प्रा. शितल साळोखे, प्रा. राज अलासकर आदींसह प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
mist
28 ° C
28 °
27.9 °
83 %
2.6kmh
75 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page