Homeशैक्षणिक - उद्योग एनआयटीमध्ये अभियंता दिनानिमित्त विविध उपक्रम

एनआयटीमध्ये अभियंता दिनानिमित्त विविध उपक्रम

कोल्हापूर :
उंचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (एनआयटी) मध्ये विविध उपक्रमांनी अभियंता दिन साजरा करण्यात आला.
‘प्रिन्स शिवाजी’चे चेअरमन डाॅ. के. जी. पाटील यांनी सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर विभागाच्या विद्यार्थ्यांनी काॅलेजमध्येच बनवलेल्या व्हर्टिकल मशीनिंग सेंटर (व्हीएमसी) मशीनचे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अभियांत्रिकी व्यवस्थापनावर आधारित पोस्टर प्रदर्शनाचे उदघाटन त्यांनी केले.
प्रा. अश्विनकुमार व्हरांबळे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी बनवलेल्या व्हीएमसी मशीनमध्ये प्लास्टिक, फायबरपासून अगदी ॲल्युमिनियमची उत्पादने बनवता येतील. कमी वीज वापर, कमी किंमत, कमी जागेची गरज ही या मशीनची वैशिष्ट्ये आहेत. अभियांत्रिकी संस्था व औद्योगिक प्रशिक्षणासाठी तर हे मशीन सोईस्कर ठरते. शासनाच्या युक्ती पोर्टलवर या व्हीएमसी मशीनची निवड झाल्याचे प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे यांनी सांगितले.
एआयएमएल विभागप्रमुख प्रा. विक्रम गवळी यांच्या मार्गदर्शनात आयोजित पोस्टर प्रदर्शनामध्ये अभियांत्रिकीचा उत्तम नमुना असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले किल्ले आणि त्यांच्या व्यवस्थापनाची खास वैशिष्ट्ये असलेले गुप्तहेर खाते, संदेशवहन, नेतृत्वगुण यावर आधारित पोस्टरची माहिती विद्यार्थ्यांनी उपस्थितांना दिली.
यावेळी चेअरमन डाॅ. के. जी. पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमास अधिष्ठाता प्रा. बाजीराव राजिगरे, विभागप्रमुख, स्टाफ, विद्यार्थी उपस्‍थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
mist
28 ° C
28 °
27.9 °
83 %
2.6kmh
75 %
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page