Homeसामाजिकजिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात मोफत विधी सेवा सहाय्यासाठी विधिज्ञांची नियुक्ती 

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात मोफत विधी सेवा सहाय्यासाठी विधिज्ञांची नियुक्ती 

कोल्हापूर :
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर येथे मोफत विधी सेवा सहाय्य देण्याकरीता विधिज्ञांची नियुक्ती करण्यात आली असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त आजी-माजी सैनिक, युध्द विधवा,वीर माता-पिता, माजी सैनिक विधवा व अवलंबितांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (डॉ.) भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी केले आहे.
मोफत विधी सेवा सहाय्य देण्याकरीता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे विधी सेवा चिकित्सा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षामध्ये सोमवार, मंगळवार व बुधवार या दिवशी ॲड. नितीन एन. कुलकर्णी संपर्क क्र. ८८०५१५०५१६ तर गुरुवार ते शुक्रवार या दिवशी ॲड. योगेश जोशी संपर्क क्र. ८०७६९२४५७९ यांची शासकीय सुट्या वगळून मोफत विधी सेवा सहाय्य देण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
26.6 ° C
26.6 °
26.6 °
85 %
6.9kmh
42 %
Mon
27 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
27 °
Fri
27 °

Most Popular

You cannot copy content of this page