Homeशैक्षणिक - उद्योग 'कॉसमॉस'चे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांना यंदाचा 'डॉ. डी. वाय. पाटील जीवनगौरव’

‘कॉसमॉस’चे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांना यंदाचा ‘डॉ. डी. वाय. पाटील जीवनगौरव’

• लेफ्टनंट जनरल भूपेश के. गोयल  कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी
कोल्हापूर :
येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाकडून सन २०२५-२६चा ‘डॉ. डी. वाय. पाटील जीवनगौरव पुरस्कार’ कॉसमॉस बँकेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांना जाहीर झाला.
१ सप्टेंबरला विद्यापीठाच्या २०व्या स्थापना दिनी आर्म्ड फोर्स मेडिकल सर्व्हिसेसचे महासंचालक लेफ्टनंट जनरल भूपेश के. गोयल यांच्या उपस्थितीत हा सन्मान प्रदान केला जाणार असल्याची माहिती कुलपती डॉ. संजय पाटील व कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी दिली. या समारंभाला डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांची उपस्थितीत राहणार आहे.
सोमवारी (दि.१) विद्यापीठाच्या २० व्या स्थापना दिनी सकाळी ९:३० वाजता विद्यापीठ प्रांगणात ध्वजवंदन व विद्यापीठ गीत होणार आहे. त्यानंतर सकाळी १०:३० वाजता हॉटेल सयाजीच्या मेघमल्हार सभागृहात पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. यावेळी जीवनगौरव पुरस्कारासह, आदर्श शिक्षक, आदर्श सेवक, गुणवंत विद्यार्थी असे विविध पुरस्कार प्रदान केले जाणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी दिली.
जीवनगौरव पुरस्काराने गौरविले जाणारे कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष सीए मि‍लींद काळे यांनी प्रतिकूल परिस्थितीत चार्टर्ड अकाउंटन्सी, कॉस्ट अकाउंटन्सी, बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, एमबीए फायनान्स आणि पत्रकारिता असे पाच व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. १९८३ साली त्यांनी स्वतःची चार्टर्ड अकाउंटन्सी प्रॅक्टिस सुरू केली. १९९९ पासून ते कॉसमॉस बँक संचालक तर २०१५ पासून बँकेचे अध्यक्ष होते. त्यांनी महिलांसाठी विशेष कर्ज योजना राबवून १५०० हून अधिक बचत गटांना आर्थिक सहाय्य केले. काळे यांच्या नेतृत्वाखाली बँकेला २०२३-२४ या वर्षासाठी ‘सर्वोत्कृष्ट सहकारी बँक’ पुरस्कार मिळाला. बँकिंग फ्रंट मासिकाने अलीकडेच जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे. बँकिंग सेवा, अर्थकारण, व्यवस्थापनसह विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल सीए मिलिंद काळे यांची विद्यापीठातर्फे यावर्षीच्या ‘डॉ. डी. वाय. पाटील जीवन गौरव’ पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
27.7 ° C
27.7 °
27.7 °
79 %
4.2kmh
88 %
Sun
28 °
Mon
27 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
26 °

Most Popular

You cannot copy content of this page