कोल्हापूर :
संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या उद्योजकता विकास आणि तंत्रज्ञान व्यवसाय इंकुबेटर सेल अंतर्गत राष्ट्रीय उद्योजकता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून आकुरा टेक ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर अमर जाधव हे उपस्थित होते.
उद्योजक अमर जाधव म्हणाले की, उद्योजक होण्यासाठी फक्त स्वप्ने पाहून चालत नाही, तर प्रत्यक्षात रिस्क घेऊन कृती करावी लागते. उद्योग करणे म्हणजे केवळ नफा कमावणे नसून समाजसेवा करण्यासारखेच आहे. उद्योजकतेसाठी रात्रंदिवस परिश्रम करावे लागतात. ‘सिक्रेट’ सारखी प्रेरणादायी पुस्तके वाचून दृष्टीकोन बदलावा आणि नेहमी मोठे व्हिजन निवडावे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक डॉ. विराट गिरी यांनी केले. त्यांनी जागतिक उद्योजकता दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. यावेळी प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा. प्रशांत पाटील तसेच डिग्री इंजिनिअरिंगचे विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन आणि आभार प्रदर्शन कौशल्य विकास व उद्योजकता विभाग प्रमुख प्रा. अजय कोंगे यांनी केले. सूत्रसंचालन डिप्लोमा प्रथम वर्षाच्या विद्यार्थीनी सुहाना चौगुले, आदिती कोळेकर, इफात मोमीन आणि सुहाना निरांकरी यांनी केले. घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
——————————————————-
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय उद्योजकता दिवस साजरा
RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
27
°
C
27
°
27
°
83 %
5.5kmh
41 %
Sat
27
°
Sun
27
°
Mon
27
°
Tue
27
°
Wed
27
°