Homeशैक्षणिक - उद्योग विवेकानंद कॉलेजमध्ये रानभाज्या व त्यांच्या पाककृतींचे प्रदर्शन

विवेकानंद कॉलेजमध्ये रानभाज्या व त्यांच्या पाककृतींचे प्रदर्शन

कोल्हापूर :
विवेकानंद कॉलेज (अधिकार प्रदत्त स्वायत्त) येथील वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने बुधवारी रानभाज्या व त्यांच्या पाककृतींचे प्रदर्शनआयोजन करण्यात आले होते.
या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या पौष्टीक व औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांचा समावेश करण्यात आला होता.  या उपक्रमाला प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले. याचे उदघाटन डॉ. ए. बी. आळवेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. ए. बी. आळवेकर यांनी सांगितले की, रानभाजी हा स्थानिक आहारातील महत्त्वाचा घटक असून यामध्ये पोषणमूल्य आणि औषधी गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळतो. विद्यार्थ्यांनी संशोधनाच्या माध्यमातून या परंपरेचे जतन करणे गरजेचे आहे.
प्रदर्शनात कुर्डू, पात्री, शेवगा, तांदळी, घोळ, आंबुशी तसेच करतुले अशा २५पेक्षा अधिक रानभाज्यांचे प्रदर्शन करण्यात आले होते. या भाज्यांचे औषधी गुणधर्म पोषणमूल्य, वापराच्या पद्धती व पाककृती यांची माहिती माहिती फलकाद्वारे देण्यात आली होती.
पाककृतींचे परीक्षण गृहशास्त्र विभागाप्रमुख प्रा. सई पाटील व संख्याशास्त्र विभागप्रमुख प्रा. वर्षा पवार यांच्याद्वारे करण्यात आले. वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बी. टी. दांगट यांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी आसावरी केसरकर व सिद्धी कराळे यांनी केले. या कार्यक्रमाचे संयोजन विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी यांनी केले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
27.1 ° C
27.1 °
27.1 °
84 %
4.2kmh
96 %
Sat
27 °
Sun
28 °
Mon
27 °
Tue
27 °
Wed
27 °

Most Popular

You cannot copy content of this page