Homeराजकियशक्तीपीठ विरोधात शेतकरीच शेतात फडकवणार तिरंगा

शक्तीपीठ विरोधात शेतकरीच शेतात फडकवणार तिरंगा

कोल्हापूर :
प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी शुक्रवारी, १५ ऑगस्ट रोजी ‘तिरंगा झळकवू शेतात, शक्तीपीठ नको आमच्या वावरात’ या टॅगलाईनखाली शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्यावतीने शेतात तिरंगा फडकवत अभिनव आंदोलन करण्यात येणार आहे.
काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार असून याची सुरुवात शुक्रवारी (दि.१५) सकाळी ९ वाजता आकुर्डे (ता. गारगोटी) येथील दौलत शिंदे यांच्या शेतात आंदोलन करुन होईल. त्यानंतर सकाळी १० वाजता एकोंडी (ता. कागल) लोंढे वसाहत येथील शिवाजी मगदूम यांच्या शेतात आणि त्यानंतर सकाळी ११ वाजता कोगील बुद्रुक (ता. करवीर) येथील सुशीला गोपाळ पाटील यांच्या शेतात हे अभिनव आंदोलन करण्यात येईल.
यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील, शिवसेना (उबाठा) सह संपर्कप्रमुख विजय देवणे, सम्राट मोरे, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, आर. के. मोरे, शिवाजी मगदूम, राहुल बजरंग देसाई, जीवन पाटील, सत्यजीत जाधव, शामराव देसाई, सचिन घोरपडे, शशिकांत पाटील- चुयेकर, बाबासो चौगले, बयाजी शेळके, बिद्रीचे संचालक एस. आर. कांबळे, एस. बी. पाटील, सुयोग वाडकर आदी सहभागी होणार आहेत.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
haze
29 ° C
29 °
29 °
70 %
3.1kmh
40 %
Thu
32 °
Fri
28 °
Sat
27 °
Sun
27 °
Mon
28 °

Most Popular

You cannot copy content of this page