Homeराजकियविशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय कोल्हापुरातून पुण्याला स्थलांतरीत करू नये

विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय कोल्हापुरातून पुण्याला स्थलांतरीत करू नये

• आमदार सतेज पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
कोल्हापूर :
कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे ग्रामीण भागांकरीता कार्यरत असलेले विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, यांचे मुख्यालय कोल्हापूरातून पुण्यात किंवा इतरत्र स्थलांतरीत करू नये, अशी विनंती आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
या पत्रात पुढे नमूद केले आहे की, पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्याला अनन्य साधारण महत्व आहे. व्यापार उद्योग, व्यवसाय आणि शिक्षण यांच्या दृष्टीकोनातून कोल्हापूर हे महत्वाचे केंद्र आहे. यामुळेच कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांसाठी कोल्हापूरमध्ये विशेष पोलीस महानिरीक्षकांचे कार्यालय आहे. सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे ग्रामीण भागातील नागरिकांना हे जवळच्या अंतरावर असल्याने सोईचे ठिकाण आहे. कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या ४० लाखाच्या आसपास असून. हा जिल्हा कर्नाटक, गोवा राज्य आणि कोकण विभागाला जोडणारा जिल्हा असल्याने कोल्हापूरात पोलीस आयुक्तालयाची मागणी सातत्याने होत आहे. अशावेळीच विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कार्यालय हे पुणे येथे स्थलांतरीत करण्याबाबत कार्यवाही सुरु असल्याचे समजते, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
कोल्हापूरात विशेष पोलीस महानिरीक्षकांचे कार्यालय हे स्वतंत्र इमारतीमध्ये कार्यरत असून या कार्यालयानजीक सुसज्ज असे पोलीस परेड ग्राऊंड, पोलीस अधिक्षक कार्यालय आणि प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांची तसेच पोलीस कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत. त्यामुळे गृहविभागांची कामे जलद गतीने आणि सुरळीतपणे पारपडत असतात. या कार्यालयांमुळे कर्नाटक राज्य सीमा परिसर, आणि गोवा राज्याला जोडणाऱ्या तसेच   कोकण नजीकच्या परिसरातील गुन्हेगारीवर गृहविभागाला नियंत्रण ठेवण्यास मदत होत असते. यासंदर्भात दि. १८ऑक्टोबर २०२३ रोजी पत्र व्यवहार केलेला होता, त्याचबरोबर नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात ‘विशेष उल्लेख सूचना’ मांडल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे.
वरील बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे ग्रामीण भागांकरीता कार्यरत असलेले विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांचे मुख्यालय कोल्हापूरातुन पुण्याला किंवा इतरत्र स्थलांतरीत करू नये, अशी विनंती आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
27 ° C
27 °
27 °
83 %
5.5kmh
41 %
Sat
27 °
Sun
27 °
Mon
27 °
Tue
27 °
Wed
27 °

Most Popular

You cannot copy content of this page