कोल्हापूर :
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विवेकानंद कॉलेजमध्ये भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा जयंती दिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना कौस्तुभ गावडे म्हणाले की, ग्रंथालये साचेबद्ध शास्त्रीय चाकोरीत डॉ. रंगनाथन यांच्यामुळे आली. नेहमी वाचत रहा, समृद्ध जीवन जगण्याचा वाचन हा राजमार्ग आहे. विद्यार्थ्यांची पावलं नेहमी ग्रंथालयाकडे वळावीत, हीच पावले तुम्हाला जीवनाचा मार्ग दाखवतील. वाचनामुळे जीवन समृध्द बनते.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सहाय्यक ग्रंथपाल हितेंद्र साळुंखे यांनी केले. आर. आर. साळुंखे, बी. ए. नारे, बी. एस. खोत, अजित जाधव, सुरेश इंगळे, सौ. प्रमोदिनी जाधव, सौ. प्रियांका दुर्गुळे, प्रतिक पानारी यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले. यावेळी डॉ. रंगनाथन यांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार हे होते. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी, विवेकानंद कॉलेजचे प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. अभयकुमार साळुंखे, सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे यांचे या उपक्रमास प्रोत्साहन लाभले.
——————————————————-
विवेकानंद कॉलेजमध्ये डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती साजरी
RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
27.4
°
C
27.4
°
27.4
°
82 %
5.5kmh
84 %
Sat
27
°
Sun
27
°
Mon
27
°
Tue
27
°
Wed
27
°