कोल्हापूर :
भारताच्या हरितक्रांतीचे शिल्पकार व शाश्वत शेतीचे प्रणेते भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे कृषी क्षेत्रातील योगदान असामान्य व अतुलनीय आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, हंगामानुसार नियोजन आणि यांत्रिकीकरण आत्मसात करून कृषी उत्पादनात वाढ करावी. उत्पादनाची हमी हेच शाश्वत शेतीचे यश असल्याचे प्रतिपादन कृषिभूषण पुरस्कारप्राप्त शेतकरी मच्छिंद्र कुंभार यांनी केले.
भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील बी. टेक. ॲग्री महाविद्यालयात आयोजित व्याख्यानामध्ये ते बोलत होते.
मच्छिंद्र कुंभार यांनी सेंद्रिय शेती, आंतरपिके, दुग्ध व्यवसाय, प्रक्रिया उद्योग, देशी गायींचे उत्पादन, पेरणी ते कापणी या प्रक्रियेत आधुनिक साधनांचा वापर, तसेच मियाझाकी आंबा आणि शेतीपूरक उद्योग याबद्दल अनुभव मांडले. १ एकर शेतीत १६ प्रकारची आंतरपिके घेण्याचा यशस्वी प्रयोग त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला. मजुरटंचाईवर मात करण्यासाठी यांत्रिकीकरण हाच प्रभावी उपाय असल्याचे ते म्हणाले.
४० हून अधिक मुलाखतींमधून आपले विचार मांडणारे आणि १४ राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त मच्छिंद्र कुंभार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ज्ञान घेणे थांबवू नका, शेतीतील प्रयोग आणि नवकल्पना हीच पुढील पिढीसाठी खरी प्रेरणा आहे. बदलत्या शेती व्यवस्था आणि तंत्रज्ञान आत्मसात करून त्यामधील संधींचा शोध घ्या आणि आपल्या शेतीला समृद्ध बनवा असा संदेश दिला.
डॉ. योगेश शेटे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, उपप्राचार्य इंजि. पी. डी. उके यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रीय सेवा योजनेतर्गत कार्यक्रम अधिकारी इंजि. एस. ए. इंगवले यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. सूत्रसंचालन कु. नम्रता शिंदे तर आभार प्रदर्शन कु. मैथिली गोंधळी यांनी केले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील आणि कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले
——————————————————-
शाश्वत शेतीसाठी उत्पादनाची हमी महत्त्वाची : कृषिभूषण मच्छिंद्र कुंभार
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
26.9
°
C
26.9
°
26.9
°
84 %
4.2kmh
99 %
Sat
27
°
Sun
28
°
Mon
27
°
Tue
28
°
Wed
28
°