• १००हून अधिक बहिणींनी भावाला बांधला अतूट भावबंधनाचा धागा
कोल्हापूर :
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आनूर (ता. कागल) या गावात रक्षाबंधन साजरे केले. १०० हून अधिक बहिणींनी आपल्या या लाडक्या भावाला अतुट भावबंधनाचा हा धागा बांधला.
आनूर येथे बांधलेल्या सैनिक भवनच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री श्री. मुश्रीफ गावात आले होते. या कार्यक्रमासाठी गावातील शंभरहून अधिक माताभगिनी जमल्या होत्या. स्वागतासाठी जमलेल्या महिलांनी मंत्री श्री. मुश्रीफ यांना बांधण्यासाठी राख्या आणल्या होत्या. रक्षाबंधन सणानिमित्त त्या राख्या बांधून पंचारतीने ओवाळून औक्षण करून आपल्या लाडक्या भाऊरायाचे माता-भगिनींनी रक्षाबंधन केले.
यावेळी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, माझ्या या लाडक्या बहिणींच्या पाठीशी मी सदैव भाऊ म्हणून खंबीरपणे हिमालयासारखा उभा आहे. गेल्या ४० वर्षाच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीत माझ्या लाडक्या माता- भगिनींचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी आहेत. या पुण्याईच्या शिदोरीच्या जोरावरच नेहमीच यशस्वी होत आलो आहे. असेच आशीर्वाद आणि प्रेम माझ्यावर राहू द्या, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना!
——————————————————-
मंत्री हसन मुश्रीफ यांनी आनूरमध्ये साजरे केले रक्षाबंधन
Mumbai
overcast clouds
26.1
°
C
26.1
°
26.1
°
88 %
5kmh
100 %
Sat
27
°
Sun
28
°
Mon
27
°
Tue
27
°
Wed
27
°