Homeशैक्षणिक - उद्योग डी.वाय.'च्या ३०३ विद्यार्थ्यांची आयआयटी बॉम्बेतील ‘एडटेक इंटर्नशिप’साठी निवड

डी.वाय.’च्या ३०३ विद्यार्थ्यांची आयआयटी बॉम्बेतील ‘एडटेक इंटर्नशिप’साठी निवड

कोल्हापूर :
येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एकूण ३०३ विद्यार्थ्यांची नामांकित असलेल्या आयआयटी बॉम्बेच्या ‘एडटेक इंटर्नशिप’साठी निवड झाली आहे. आयआयटी बॉम्बेच्या सेंटर फॉर एज्युकेशनल टेक्नॉलॉजी, एडटेक सोसायटी इंडिया आणि महाविद्यालच्या तंत्रज्ञान विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून ही निवड झाली आहे.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थी ‘एज्युकेशनल डेटा अ‍ॅनालिसिस’ आणि ‘एज्युकेशनल अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट’ या क्षेत्रांतील ९५ हून अधिक नावीन्यपूर्ण प्रोजेक्ट्सवर काम करत  आहेत. या उपक्रमातर्गत विद्यार्थ्यांना रिअल-टाइम इंडस्ट्री स्किल्स, डेटा हाताळणी, एआय आधारित शैक्षणिक प्रयोग आणि इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स डेव्हलपमेंट याबाबत अनुभव मिळणार आहे. या इंटर्नशिपद्वारे विद्यार्थ्यांना रिसर्च-ओरिएंटेड लर्निंग, इनोव्हेशन, आणि आधुनिक प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळली आहे.
या उपक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून आयआयटी बॉम्बेचे प्रा. रामकुमार राजेंद्रन, एडटेक सोसायटी इंडियाचे डॉ. अश्विन टी. एस. आणि महाविद्यालयाचे इंटर्नशिप समन्वयक डॉ. कपिल कदम यांचे विशेष योगदान लाभले आहे. डीन (अकॅडेमिक्स) प्रा. भगतसिंग जितकर, डीन (सी.डी.सी.आर) प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईंगडे, कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनियरिंग विभागप्रमुख प्रा. राधिका धनाल, डेटा सायन्स  विभाप्रमुख डॉ. गणेश पाटील, एआय- एमएल विभागप्रमुख डॉ. सिद्धेश्वर पाटील यांचे सहकार्य लाभले.
निवड झालेल्या विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे आणि रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे यांनी अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
26.7 ° C
26.7 °
26.7 °
87 %
7.8kmh
38 %
Mon
27 °
Tue
27 °
Wed
28 °
Thu
27 °
Fri
27 °

Most Popular

You cannot copy content of this page