कोल्हापूर :
स्नेह संगीत प्रतिज्ञाच्यावतीने प्रसिद्ध गायक, अभिनेता व दिग्दर्शक किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त दि. ४ ते १० ऑगस्ट या कालावधीत ‘किशोर कुमार गीत महोत्सव’ या सांगीतिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेच्या ‘स्नेह संगीत प्रतिज्ञा’ च्यावतीने सांगीतिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील गरजू व्यक्तींना यथाशक्ती आधार दिला जातो. याकरिता विविध कला प्रकारातील उपक्रम राबवले जातात. यावर्षी जाणीव फाउंडेशन, श्रीमती यमुनाताई पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था यांचे संयुक्त विद्यमाने लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, गीतकार, संगीतकार, गायक, दिग्दर्शक, निर्माता या सर्वच पातळ्यांवर स्वतःची दैदिप्यमान अशी कारकिर्द घडवणारे असे अष्टपैलू कलाकार किशोर कुमार यांना अभिवादन म्हणून “किशोर कुमार गीत महोत्सव” या सात दिवसीय सांगीतिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रशांत जोशी यांची संकल्पना असलेला हा सांगीतिक उपक्रम दि. ४ ते १० ऑगस्ट दरम्यान, साने गुरुजी वसाहत येथील विकास प्रतिज्ञा स्टुडिओ येथून फेसबुक लाईव्हद्वारे सायंकाळी ठीक ७:३० वाजता होईल. या उपक्रमात स्नेह संगीत प्रतिज्ञाचे गायक कलाकार सहभागी होत असून, किशोर कुमार यांचा विविध टप्प्यावरील गीत प्रवास उलगडला जाणार आहे.
या उपक्रमातून जमणारा निधी गरजूंना दिला जाणार आहे. १२ रसिक श्रोत्यांसाठी स्टुडिओत ऐच्छिक शुल्क आकारून बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी आपले आसन आरक्षित करण्यासाठी प्रशांत जोशी यांच्या ७७२००८८८१४ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संयोजक बाळासाहेब कदम, विकास मोने व प्रशांत जोशी यांनी केले आहे.
——————————————————-
स्नेह संगीत प्रतिज्ञातर्फे ‘किशोर कुमार गीत महोत्सव’
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
25
°
C
25
°
25
°
50 %
2.1kmh
0 %
Thu
26
°
Fri
27
°
Sat
27
°
Sun
28
°
Mon
29
°

