Homeराजकियआमचं ठरलंय....काँग्रेस सोडायची न्हाय

आमचं ठरलंय….काँग्रेस सोडायची न्हाय

• राधानगरीतील पदाधिकाऱ्यांचा सतेज पाटील यांना शब्द
कोल्हापूर :
राधानगरी तालुका हा पहिल्यापासून काँग्रेसची विचारधारा जपणारा तालुका आहे. याच विचारधारेने या तालुक्यातील जनता एकनिष्ठतेला नेहमी प्राधान्य देत आली आहे. आमचा डीएनए काँग्रेसचा असून काँग्रेस कधीच सोडणार नाही असा शब्द देत पक्षातच ठाम राहण्याचा निर्धार राधानगरी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी केला. या पदाधिकाऱ्यांनी खासदार शाहू छत्रपती व काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा संकल्प केला. तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार सतेज पाटील यांची भेट घेत काँग्रेससोबत राहण्याची ग्वाही दिली.
काँग्रेसची विचारधारा एकसंघपणे राधानगरी तालुक्यात पुढे नेण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत असा निर्धार या सर्वांनी व्यक्त केला. यावेळी सतेज पाटील यांनी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ देणे ही माझी जबाबदारी आहे. असे निष्ठावंत कार्यकर्तेच पक्षाची खरी मुलुख मैदानी तोफ आहेत. त्यामुळे पुढच्या काळात निष्ठावंत कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काँग्रेसचा विचार अधिक बुलंद करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन या शब्दांत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले.
यावेळी राधानगरी तालुका काँगेसचे तालुकाध्यक्ष भोगावतीचे जेष्ठ संचालक हिंदुराव चौगले यांनी राधानगरी तालुक्यातील निष्ठावंत काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आगामी सर्व निवडणूकांमध्ये खासदार शाहू छत्रपती व आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या जोमाने काम करतील असे सांगितले.
यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक अभिजित तायशेटे, भोगावतीचे माजी चेअरमन सदाशिवराव चरापले, काँग्रेसचे समन्वयक सुशिल पाटील, भोगावतीचे माजी संचालक ए. डी. पाटील गुडाळ, संजयसिंह पाटील तारळे, सुधाकर साळोखे, अशोक साळोखे, माजी जि. प. सदस्य पांडुरंग भांदीगरे, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक बाजीराव चौगले, मोहन धुंदरे, लहू कुसाळे आदींनी खासदार शाहू छत्रपती व आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी प्रामाणिकपणे काम करुया असा निर्धार व्यक्त केला.

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
28.5 ° C
28.5 °
28.5 °
75 %
3.7kmh
100 %
Sat
29 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °
Wed
28 °

Most Popular

You cannot copy content of this page