Homeशैक्षणिक - उद्योग दुग्ध उत्पादन वाढीसाठी गोकुळच्या सुधारित योजना लाभदायी ठरतील : नविद मुश्रीफ

दुग्ध उत्पादन वाढीसाठी गोकुळच्या सुधारित योजना लाभदायी ठरतील : नविद मुश्रीफ

कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मार्फत २० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार करण्याचा संचालक मंडळाने संकल्प केला. तो पूर्ण करण्याच्या दृष्टीने संघामार्फत विविध योजना राबवून दूध वाढ कृती कार्यक्रम राबविला जात आहे. दुग्ध उत्पादन वाढीसाठी केलेल्या या सुधारित योजना नक्कीच लाभदायी ठरतील, असे प्रतिपादन गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी केले.
गोकुळ दूध संघाच्यावतीने प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दूध वाढ कृती कार्यक्रमाअंतर्गत शेतकरी दूध उत्पादकांना तसेच तरुणवर्गाला या दुग्ध व्यवसायाकडे वळविण्यासाठी संघामार्फत विविध योजनेअंतर्गत दूध उत्पादक व दूध संस्थांना अनुदान देण्यात येतात. बुधवारी (दि.२३) झालेल्या संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये काही अनुदान योजनेमध्ये बदल करणेचे धोरण ठरवण्यात आले असून दूध उत्पादकांची मागणी, काही सूचना लक्षात घेता काही योजनेतबदल करून सुधारित योजना राबविण्यात येणार आहेत.
गोकुळ दूध संघामार्फत दिले जाणारे जातिवंत म्हैस खरेदी अनुदान, वासरू संगोपन अनुदान, सचिव कमिशन रक्कमेमध्ये वाढ केली आहे. तसेच फर्टीमिन प्लस सवलतीच्या दरात या सर्व योजनामध्ये नवीन सुधारणा केल्या असून या सुधारित योजना दूध उत्पादन वाढीसाठी नक्कीच लाभदायी ठरतील. तसेच या सुधारित योजनांच्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा व दूध उत्पादन वाढीस गती मिळणार आहे.
गोकुळने नेहमीच शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. म्हैस खरेदी अनुदानात वाढ, संगोपन योजना, आरोग्यदायी फर्टीमिन सवलत व सचिवांसाठी प्रोत्साहनात्मक धोरणे राबवली गेली आहेत. गोकुळ संघ दूध उत्पादकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. नवीन योजनांचा लाभ घेऊन प्रत्येक शेतकरी समृद्ध व्हावा, तसेच तरुणांनी या दुग्ध व्यवसायाकडे वळावे हीच आमची अपेक्षा आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
mist
27 ° C
27 °
27 °
89 %
2.1kmh
75 %
Wed
27 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page