Homeशैक्षणिक - उद्योग विवेकानंद कॉलेजमध्ये राखी तयार करण्याची कार्यशाळा

विवेकानंद कॉलेजमध्ये राखी तयार करण्याची कार्यशाळा

कोल्हापूर :
येथील विवेकानंद कॉलेजमधील गृहविज्ञान विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने राखी तयार करण्याची कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत सौ. रेखा मलाबादे यांनी विविध प्रकारच्या राख्या बनविण्याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
यंदा ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. या सणाच्या अनुषंगाने राखी तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये क्रिस्टल राखी, लोकरी फुलांची राखी, नथ फुल राखी असे राख्यांचे अनेक प्रकार विद्यार्थ्यांनी सौ. मलाबादे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केले.
यावेळी आयक्यूएसी समन्वयक डॉ. श्रुती जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी मनोगतातून मानवी बुद्धिमत्ता व कौशल्य यांचे जीवनातील महत्त्व विशद केले. कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यशाळेत स्वागत व प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉ. उर्मिला खोत यांनी केले. आभार योगिता पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन सई पाटील यांनी केले. कार्यशाळेस विद्यार्थी, विद्यार्थिनी व प्राध्यापक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
25 ° C
25 °
25 °
50 %
2.1kmh
0 %
Thu
26 °
Fri
27 °
Sat
27 °
Sun
28 °
Mon
29 °

Most Popular

You cannot copy content of this page