कोल्हापूर :
शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्यावतीने चार सभासदांच्या वारसांना सभासद अपघाती विमा चेक प्रदान करण्यात आले. महापूरात अपघाती मयत झालेले अण्णासो सुरेंद्र हसुरे (रा. अकिवाट), सुहास गुंडाप्पा कोले (रा. औरवाड), सुशांत सदाशिव सूर्यवंशी (रा. अर्जुनवाड), गणपती संभा माने (रा. येडूर) यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपये पॉलिसी चेक प्रदान करण्यात आला.
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्यावतीने सभासदांसाठी अपघात विमा पॉलिसी घेतली जाते. कारखान्याच्या सभासद बंधूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्व सभासदांचा अपघात विमा पॉलिसी घेतली आहे. दुर्दैवाने एखाद्या सभासदाचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा सर्व अवयव निकामी झाल्यास किंवा कायमस्वरूपी दोन डोळे किंवा दोन हातपाय निकामी झाले तर एक लाख रुपये आणि एक डोळा किंवा एक हातपाय निकामी झाल्यास ५० हजार रुपये इतकी विम्याची रक्कम पॉलिसीमुळे मिळते. या विमा पॉलिसी न्यू इंडिया इन्शुरन्स लिमिटेड इचलकरंजी यांचेकडून धारण केलेली आहे. याच पॉलिसी अंतर्गत महापुरामध्ये अपघाती मयत झालेल्या चार सभासदांच्या वारसांन पॉलिसी चेक प्रदान करण्यात आला.
आजअखेर मयत सभासदांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपये प्रमाणे ९६ सभासदांच्या वारसांना ९६ लाख रुपये व हात पाय निकामी झालेल्या तीन सभासदांना प्रत्येकी ५० हजार रुपये प्रमाणे असे एकूण ९९ सभासदांना आत्तापर्यंत ९७ लाख ५० हजार आर्थिक मदत देण्यात आली.
चेक प्रदान कार्यक्रम दत्त कारखाना उद्योग समुहाचे प्रमुख गणपतराव पाटील, चेअरमन रघुनाथ पाटील, संचालक विजय सुर्यवंशी, विमा प्रतिनिधी ऋषिकेश पाटील, कामगार युनियनचे अध्यक्ष बाळू उर्फ प्रदीप बनगे व इतर मान्यवर संचालकांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, फायनान्स मॅनेजर संजय भोसले, विमा सल्लागार एकनाथ अंबाजी पाटील, कोल्हापूरचे क्लेम मॅनेजर वसंत कोल्हे, पुण्याचे रिजनल मॅनेजर प्रेमचंद मोरे, उप महाप्रबंधक एच. बी. अरुण कुमार, वरिष्ठ सहाय्यक रश्मी पिसाळ, मृणाल उरुणकर, रोहन खाडीलकर, शुभम कदम, कारखान्याचे व शेअर विभागाचे परवेज मेस्त्री, मंडल अधिकारी अरुण शेट्टी आदी उपस्थित होते.
श्री दत्त साखर कारखान्याच्यावतीने सभासद अपघाती विमा चेक प्रदान
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
31
°
C
31
°
30.9
°
33 %
4.1kmh
20 %
Sun
30
°
Mon
28
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°

