Homeशैक्षणिक - उद्योग सूक्ष्म सिंचनातून शाश्वत शेतीकडे वाटचाल करा : अरुण देशमुख

सूक्ष्म सिंचनातून शाश्वत शेतीकडे वाटचाल करा : अरुण देशमुख

• डॉ. डी. वाय. पाटील बीटेक ॲग्री महाविद्यालय येथे मार्गदर्शन
कोल्हापूर :
बदलत्या हवामान व सामाजिक परिस्थितीमध्ये शेतीला आधुनिकतेची जोड देणे अत्यंत आवश्यक आहे. जलसिंचनाचे विविध प्रकार, स्वयंचलित उपकरणे, तसेच स्मार्ट शेती पद्धती यांचा प्रभावी वापर काळाची गरज बनली आहे. डिजिटल शेती आणि सूक्ष्म सिंचनातून शाश्वत शेतीकडे वाटचाल करावी, असे आवाहन नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणेचे कृषिशास्त्र विभाग प्रमुख अरुण देशमुख यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, तळसंदे येथे आधुनिक सूक्ष्म सिंचन आणि डिजिटल शेती पद्धती याविषयी मार्गदर्शन करताना देशमुख बोलत होते.
बदलत्या काळाप्रमाणे शेतीमध्ये देखील अमुलाग्र बदल होत आहेत. वेगवेगळ्या जलसिंचन पद्धती त्याचबरोबर स्वयंचलित यंत्रांचा शेतीमधला वापर हा येणाऱ्या काळामध्ये गरजेचा झाला आहे. कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून डी. वाय. पाटील ग्रुप कायमच नवनवीन तंत्रज्ञान विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे हे कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
नेटाफिमसारख्या मार्केटमध्ये साठ वर्ष काम करणाऱ्या कंपनीची कार्यपद्धती तसेच त्यांचे शेती उपयोगी तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन काळातच मिळावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अरुण देशमुख यांचा सत्कार डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित ‘ट्रान्सफोर्मिंग हायर एज्युकेशन अ जर्नी इनटू न्यू डायमेन्शन’ हा ग्रंथ देऊन करण्यात आला.
शेतीमधील बदलत्या तंत्रज्ञानाचा मागोवा घेताना देशमुख यांनी शेतकरीवर्गाचा देश उभारणीतील सहभाग सांगून सूक्ष्म सिंचन पद्धती ही येणाऱ्या काळामध्ये किती गरजेची आहे, याविषयी मार्गदर्शन केले. प्रत्येक गोष्ट पैशासाठी न करता आपल्या कामाच्या माध्यमातून आपण समाजाचे ऋण फेडताना पैसा आपोआपच आपल्या मागे येतो असे मत व्यक्त केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पाटील, उपप्राचार्य प्रा. प्रविण उके तसेच सर्व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर डॉ. योगेश शेटे आणि प्रा. संदीप पाटील यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील तसेच कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
27.6 ° C
27.6 °
27.6 °
78 %
3.7kmh
99 %
Sat
29 °
Sun
29 °
Mon
28 °
Tue
28 °
Wed
28 °

Most Popular

You cannot copy content of this page