कोल्हापूर :
येथील रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर अमित रंगराव पाटील यांनी ‘नेटवर्कएफपी’ या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे आयोजित ‘क्वालिफाइड पर्सनल फायनान्स प्रोफेशनल (QPFP)’ ही अत्यंत प्रतिष्ठेची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे. या परीक्षेत संपूर्ण भारतातून केवळ १५० उमेदवारांनी यश मिळवले असून, अमित पाटील हे त्यापैकी एक आहेत. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
‘नेटवर्कएफपी’ या संस्थेच्यावतीने नुकताच मुंबईत दिमाखदार सोहळा पार पडला. मुंबईतील या कार्यक्रमात फायनान्शिअल सर्विस इंडस्ट्रीतील दिग्गज अमित त्रिवेदी यांच्या हस्ते अमित पाटील यांना पदक देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी ‘नेटवर्कएफपी’चे डायरेक्टर सादिक निलगुंड, विशाल धवन, कविता मेनन, दिपेन चंचलानी आदी उपस्थित होते.
QPFP परीक्षेची वैशिष्ट्ये…
• ही परीक्षा वैयक्तिक आर्थिक नियोजन, गुंतवणूक, विमा, कर नियोजन आणि वित्तीय सल्ला या क्षेत्रातील व्यावसायिक कौशल्यांसाठी घेतली जाते.
• ‘नेटवर्कएफपी’ ही संस्था आर्थिक सल्लागारांना जागतिक दर्जाची व्यावसायिक मान्यता देते.
—————
विश्वासार्ह आर्थिक सल्ला देण्याची संधी…
QPFP ही परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झालो, ही अभिमानाची बाब आहे. या यशाचे श्रेय मार्गदर्शक, कुटुंबिय आणि सहकारी यांना आहे. QPFP प्रमाणपत्रामुळे ग्राहकांना दर्जेदार आणि विश्वासार्ह आर्थिक सल्ला देण्याची संधी मिळेल.
– अमित पाटील
अमित पाटील यांचे राष्ट्रीय स्तरावरील QPFP परीक्षेत यश
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
27.6
°
C
27.6
°
27.6
°
78 %
3.7kmh
99 %
Sat
29
°
Sun
29
°
Mon
28
°
Tue
28
°
Wed
28
°