Homeशैक्षणिक - उद्योग डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला फोटोकेटालिटिक डाई विघटनासाठी पेटंट

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला फोटोकेटालिटिक डाई विघटनासाठी पेटंट

कोल्हापूर :
        डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधकांनी फोटोकेटालिटिक डाई विघटनासाठी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाला भारतीय पेटंट प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. “टू सिन्थेसिस ऑफ हायली पोरस झिंक आयर्न ऑक्साईड नॅनोपार्टिकल्स फॉर फोटोकेटालिटिक डाई डिग्रेडेशन” तंत्रज्ञानाला पेटंट मंजूर झाले असून विद्यापीठाला मिळालेले हे ५४वे पेटंट आहे.
         डॉ. विश्वजीत एम. खोत यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आहे आहे. डॉ. केतकी व्ही. कदम आणि डॉ. अश्विनी बी. साळुंखे यांचा या संशोधन कार्यत सहभाग होता. यामध्ये नव्या प्रक्रियेद्वारे उच्च सच्छिद्र झिंक आयर्न ऑक्साईड नॅनोकणांचे संश्लेषण करण्यात आले आहे. ही प्रक्रिया रंगद्रव्य विघटन अधिक पर्यावरणपूरक आणि कार्यक्षम बनवण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. रासायनिक प्रक्रियेद्वारे विकसित करण्यात आलेली ही पद्धत तुलनेने अधिक सोपी आणि कमी खर्चिक असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.
         संशोधन विभागाचे अधिष्ठाता प्रा. सी. डी. लोखंडे यांनी ही मान्यता विद्यापीठासाठी महत्त्वपूर्ण उपलब्धी असल्याचे सांगितले. हे पेटंट पुढील २० वर्षांसाठी विद्यापीठाच्या नावे संरक्षित राहणार आहे.
          या उल्लेखनीय यशासाठी सर्व संशोधकांचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
27.6 ° C
27.6 °
27.6 °
82 %
7.5kmh
77 %
Fri
28 °
Sat
28 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page