Homeराजकियपदवीधर-शिक्षक निवडणुकीत कार्यकर्त्याने पूर्ण ताकदीने मैदानात उतरावे : प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

पदवीधर-शिक्षक निवडणुकीत कार्यकर्त्याने पूर्ण ताकदीने मैदानात उतरावे : प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

कोल्हापूर :
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयाचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून प्रत्येक कार्यकर्त्याने पूर्ण ताकदीने मैदानात उतरावे. मतदारांशी थेट संपर्क साधून त्यांना मतदानासाठी प्रयत्न करावे आणि बूथस्तरावरील यंत्रणा अधिक सक्षम करावी, असे ठाम आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी केले.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा जिल्हा कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दहा विधानसभा मतदारसंघांच्या प्रमुखांची विस्तृत आढावा बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेतला.
प्रत्येक बूथवर जबाबदारी निश्चित करा, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचा आणि नियोजनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करा, असा स्पष्ट संदेश प्रदेशाध्यक्षांनी या बैठकीत दिला. मतदान केंद्रांची रचना, बूथनिहाय कार्यकर्त्यांची नियुक्ती, जबाबदाऱ्यांचे वाटप आणि मतदानाच्या दिवशी मतदारांना केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक व्यवस्था यांचा सूक्ष्म आढावा घेण्यात आला. केवळ नियोजन करून थांबू नका, तर प्रत्येक जबाबदारीचा नियमित आढावा घेऊन कामाचा प्रत्यक्ष परिणाम दिसला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी मतदारसंघनिहाय मतदान केंद्रांची माहिती देत निवडणूक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. उपस्थित मंडलाध्यक्ष आणि पदवीधर-शिक्षक मतदारसंघ संयोजकांनी मंडळ स्तरावरील संघटनात्मक रचना पूर्ण करून मतदारांशी थेट संपर्क वाढविण्याची ग्वाही दिली.
या बैठकीस खा. धनंजय महाडिक, मकरंद देशपांडे, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, सुरेश हाळवणकर, महापौर रूपाराणी निकम, महेश जाधव, आमदार शिवाजी पाटील, प्रकाश आवाडे, कृष्णराज महाडिक, विक्रम पावसक यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
28.5 ° C
28.5 °
28.5 °
65 %
2.9kmh
1 %
Tue
28 °
Wed
31 °
Thu
31 °
Fri
30 °
Sat
29 °

Most Popular

You cannot copy content of this page