कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेल्या आंतर विभागीय बास्केटबॉल महिलांच्या स्पर्धा लोकनेते शरद पाटील महाविद्यालय मिरज या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत विवेकानंद महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. सलग दुसऱ्या वर्षी द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
या स्पर्धेत एकूण बारा संघानी सहभाग नोंदविला होता. विवेकानंद महाविद्यालयाच्या संघात भाग्यश्री अंबी, श्रुती भोसले, ज्ञानेश्वरी हिलगे, श्रद्धा गुंजाटे, भक्ती गुंजाटे, महेक मुल्ला, इशा जाधव, श्रावणी बोडके, कोमल चौगुले, हर्षली चव्हाण, निकिता मगदूम, वैष्णवी बोडेकर यांचा सहभाग होता.
या खेळाडूंना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे, विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, डॉ. सी. बी. पाटील, डॉ. एकनाथ आळवेकर, जिमखाना विभागप्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, रजिस्ट्रार एस. के. धनवडे, सुरेश चरापले तसेच खेळाडूंच्या आई-वडिलांचे मार्गदर्शन लाभले.
महिला बास्केटबॉल स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा विवेकानंद महाविद्यालय द्वितीय
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
28.5
°
C
28.5
°
28.5
°
65 %
2.9kmh
1 %
Tue
28
°
Wed
31
°
Thu
31
°
Fri
30
°
Sat
29
°

