कोल्हापूर :
पिछाडीवरून आघाडी घेत पाटाकडील तालीम मंडळने प्रॅक्टीस फुटबॉल क्लबवर २ विरूध्द १ गोलने मात करून स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. पाटाकडीलच्या यशराज कांबळेला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
पाटाकडील तालीम मंडळ व डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप, कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने आणि कै. पांडबा जाधव व कै. रावसाहेब सरनाईक यांचे स्मरणार्थ ‘सतेज चषक २०२६’ फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. छत्रपती शाहू स्टेडियमवर बुधवारी, पाटाकडील आणि प्रॅक्टीस क्लब यांच्यातील सामना चुरशीचा झाला. सागर चिलेची पहिलीच चढाई अयशस्वी ठरली. त्यानंतरच्या चढाईत अजिंक्य नलवडेने दिलेल्या पासवर मोठ्या डी बाहेरून सागर चिलेने चेंडूला थेट गोलजाळ्याची दिशा दाखवली. ८व्या मिनिटाला १-०ची महत्वपूर्ण आघाडी मिळाली. पण ही आघाडी फारवेळ टिकवता आली नाही. पाटाकडीलकडून झालेल्या चढाईत यशराज कांबळेने टाकलेल्या लॉपवर ऋषिकेश मेथे-पाटीलने हेडव्दारा गोलचा प्रयत्न केला पण पाटाकडीलचा गोलरक्षक अमर गवळीने चेंडू पकडून तो प्रयत्न असफल ठरविला. एका चढाईत अमीन खझीरने दिलेल्या पासवर मोठ्या डी मधून यशराज कांबळेने जोरदार फटक्यावर चेंडू थेट गोलजाळ्यात धाडला अन् १४व्या मिनिटाला संघाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर रोमारिओ, अमीन खझीर, ऋषिकेश मेथे-पाटील, यशराज कांबळे यांनी गोलसाठी प्रयत्न केले पण त्यांना यश मिळाले नाही. तसेच प्रॅक्टीसकडून अजिंक्य नलवडे, सागर चिले, प्रदीप शिंदे, रोहित भोसले यांनी केलेल्या चढाया वाया गेल्या. पूर्वार्धात सामना १-१ बरोबरीत राहिला.
उत्तरार्धात आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघाकडून वेगवान खेळ झाला. त्यामध्ये पाटाकडीलला यश मिळाले. बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या रोहित पवारच्या पासवर गोलक्षेत्रात ऋषिकेश मेथे-पाटीलने अमीन खझीरकडे हेडव्दारा चेंडू पास केला, त्यावर अमीन खझीरने हेडव्दारा गोल नोंदवून संघाची आघाडी २-१ अशी वाढवली. ४९व्या मिनिटाला मिळालेल्या आघाडीनंतर डी टॉपवरून रोहित मंडलिकने मारलेल्या फटक्यावर चेंडू गोलपोस्टवरून बाहेर गेला. यशराज कांबळे, ऋषिकेश मेथे-पाटील, रोमारिओ, अमीन खझीर यांनी गोलक्षेत्र भेदणाऱ्या चढाया केल्या पण त्यांना यश मिळाले नाही. प्रॅक्टीसकडून अजिंक्य नलवडेने गोलची सोपी संधी दवडली. आकाश बावकरने मारलेला जोरदार फटका गोलरक्षक अमर गवळीने तितक्याच तत्परतेने बाहेर काढून गोलचे संकट दूर केले. बदली खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या उत्सव मरळकरला गोलच्या दोन सोप्या संधी मिळाल्या पण त्याचा त्याला लाभ उठवता आला नाही. निर्धारित वेळेतील दोन मिनिटे शिल्लक असताना उत्सव मरळकरला गोलक्षेत्रात अत्यंत सोपी संधी मिळाली पण तो गोल नोंदवू शकला नाही, परिणामी सामना बरोबरीची संधी हुकली. त्यानंतर जादावेळेत उत्सवने मारलेल्या फटक्यावर चेंडू गोलरक्षक अमर गवळीने काढून गोलची संधी परतावून लावली. अखेर उर्वरित वेळेत २-१ची आघाडी राखत पाटाकडीलने सामना जिंकून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
——————————
पाटाकडील उपांत्य फेरीत
RELATED ARTICLES
Mumbai
haze
28
°
C
28
°
28
°
74 %
3.6kmh
20 %
Wed
28
°
Thu
29
°
Fri
30
°
Sat
30
°
Sun
30
°

