कोल्हापूर :
कोल्हापूर स्पोर्ट्स् असोसिएशनच्या वतीने के.एस.ए. कोल्हापूर जिल्हा पुरूष (खुला गट) फुटबॉल संघासाठी निवड चाचणी घेतली जाणार आहे. ही निवड चाचणी शुक्रवारी (दि.१०) सकाळी ७ वाजता छत्रपती शाहू स्टेडियम कोल्हापूर येथे घेण्यात येणार आहे. या निवड चाचणीमध्ये फक्त के.एस.ए. वरिष्ठ गटातील (“ए” डिव्हीजन) पात्र संघांमधील नोंदणीकृत खेळाडूंनाच प्रवेश आहे.
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन च्यावतीने कोल्हापूर येथेच एप्रिल २०२६ मध्ये महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा पुरूष (खुला गट) टीयर-१ फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे. यासाठी कोल्हापूर स्पोर्ट्स् असोसिएशनचा जिल्हा संघ पाठविण्यात येणार आहे. याकरिता के.एस.ए.च्यावतीने निवड चाचणी घेण्यात येणार आहे.
तरी या निवड चाचणीकरिता केएसए “ए ” डिव्हीजन १६ संघांनी आपल्या संघातील उत्कृष्ट खेळाडूंना शुक्रवारी (दि.१०) सकाळी ७ वाजता फुटबॉल किटवर छत्रपती शाहू स्टेडियम कोल्हापूर येथे पाठवावे, असे केएसएच्यावतीने संघांना कळविण्यात येत आहे.
वरिष्ठ गटातील खेळाडूंसाठी कोल्हापूर जिल्हा फुटबॉल संघ निवड चाचणी
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
31
°
C
31
°
30.9
°
62 %
6.2kmh
40 %
Wed
30
°
Thu
29
°
Fri
29
°
Sat
30
°
Sun
29
°

