कोल्हापूर :
जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत जनगणना २०२७ कामकाज सुरू झाले असून यामध्ये जिल्ह्यातील १२ तहसील कार्यालये व १३ नगरपालिका – नगरपंचायत कार्यक्षेत्राकरिता नियुक्त अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाला सोमवार, दि. ६ एप्रिलपासून निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव तथा कोल्हापूर जिल्हा जनगणना अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन सभागृहात प्रारंभ करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना श्री. गुरव म्हणाले, जनगणनेचे कामकाज हे देशाच्या नियोजन व व्यवस्थापन प्रक्रियेत अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जिल्ह्यातील सर्व नियुक्त अधिकारी – कर्मचाऱ्यांनी हे प्रशिक्षण गांभीर्याने घ्यावे. याकामी दुर्लक्ष करू नये असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्ह्यातील जनगणनेचा पहिला टप्पा (घरयादी व घरगणना) दिनांक १६ मे ते १४ जून दरम्यान होणार असून नागरिकांना घरबसल्या स्वयंगणना दिनांक १ मे ते १५ मे दरम्यान करता येणार आहे. यावेळची जनगणना ही प्रथमच डिजिटल पद्धतीने करण्यात येणार असून त्यासाठी CMMS पोर्टल व स्वतंत्र ॲप विकसित करण्यात आले आहे. यासाठी आवश्यक मनुष्यबळ नेमण्यात आले असून जिल्ह्यातील १२ तालुके व १३ नगरपालिका – नगरपंचायतींसाठी सुमारे ५६९५ प्रगणक व तर ९८९ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.
काल जिल्ह्यातील ९० क्षेत्रीय प्रशिक्षकांना मास्टर ट्रेनर रूपाली सुर्यवंशी (तहसीलदार – गगनबावडा) व सांख्यिकी अधिकारी गजानन पाटील यांनी प्रशिक्षण दिले. यावेळी तहसीलदार (करमणूक) तेजस्वीनी पाटील, नायब तहसीलदार नितीन धापसे – पाटील, करमणूक कर निरीक्षक प्रकाश जाधव यांच्यासह करमणूक कर विभागाचे इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————
जनगणना २०२७ – क्षेत्रीय प्रशिक्षकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष प्रशिक्षण शिबिर
Mumbai
smoke
31
°
C
31
°
30.9
°
62 %
6.2kmh
40 %
Wed
30
°
Thu
29
°
Fri
29
°
Sat
30
°
Sun
29
°

