• रमजान ईद दिवशी २५ लाख ४५ हजार लिटर दूध विक्रीचा ‘गोकुळ’ चा नवा उच्चांक
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) कडून रमजान ईद व गुढीपाडवा या दुहेरी सणांच्या पार्श्वभूमीवर दुधाच्या विक्रीत यंदा उल्लेखनीय वाढ नोंदवण्यात आली आहे. रमजान ईद दिवशी २५ लाख ४५ हजार लिटर्स दुधाची विक्रमी विक्री झाली असून हा गोकुळच्या इतिहासातील एक दिवसाचा उच्चांक ठरला आहे.
तसेच गुरुवारी (दि.१९) साजऱ्या झालेल्या गुढीपाडव्यानिमित्य १८ लाख लिटर्स दूध विक्री झाली असून श्रीखंड व बासुंदी यासारख्या दुग्धजन्य पदार्थाच्या विक्रीत उच्चांकी वाढ झाली आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संघाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावतीने महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला व रमजान ईद दिनानिमित्य गोकुळ परिवाराच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
गुढीपाडवा व रमजान ईद हे पवित्र सण या दिवशी गोडधोड करण्यासाठी दुधाला मोठ्या प्रमाणात दुधाची मागणी असते. यावेळी रमजान ईदनिमित्य २५ लाख ४५ हजार ०४७ लिटर्स इतकी दूध विक्री एक दिवसात झाली. गेल्यावर्षी रमजान ईदला २३ लाख ६३ हजार १७० लिटर्स दूध विक्री झाली होती. यंदा त्यामध्ये १ लाख ८१ हजार ८७७ लिटर्सची वाढ झाली. तसेच झालेल्या गुढीपाडव्यादिवशी १८ लाख लिटर्स दूध विक्री तसेच श्रीखंड व बासुंदी विक्रीमध्ये उच्चांकी वाढ झाली असून गोकुळने सातत्याने प्रगतीचा आलेख उंचावत नवीन मानदंड निर्माण केला आहे.
या यशामध्ये गोकुळचे दूध उत्पादक शेतकरी, ग्राहक, वितरक, दूध संस्था, कर्मचारी, अधिकारी, केंद्र चालक, वाहतूक ठेकेदार व हितचिंतक मोलाचे योगदान आहे. सर्व घटकांच्या समन्वयातून गोकुळने विक्रीत उल्लेखनीय वाढ केली आहे.
दरम्यान, चेअरमन नविद मुश्रीफ यांनी भविष्यात प्रतिदिन २७ लाख लिटर दूध विक्रीचे ध्येय, दूध उत्पादक व ग्राहकांच्या विश्वासाहर्ततेवर तसेच कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून साध्य करू, असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ, गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील, प्रशासन व्यवस्थापक रामकृष्ण पाटील, प्रकाश आडनाईक, कैलास मोळक, लक्ष्मण धनवडे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील तसेच मार्केटिंग विभागाचे अधिकारी व कर्मचारी, कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
——————————
गोकुळ’च्या दुधाची विक्रमी विक्री
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
28.2
°
C
28.2
°
28.2
°
62 %
8.8kmh
3 %
Sat
28
°
Sun
30
°
Mon
31
°
Tue
29
°
Wed
29
°

