• चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ
कोल्हापूर :
बालगोपाल तालीम मंडळ आयोजित व जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत ‘चंद्रकांत चषक -२०२६’ फुटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला. दिलबहार तालीम मंडळने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळवर ३-०ने मात करून गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला ‘विजयाची गुढी’ उभारली. स्वयंम साळोखे सामनावीर ठरला. फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळला पुढे चाल मिळाली.
छत्रपती शाहू स्टेडियमवर दिलबहार आणि उत्तरेश्वर या सामन्याने स्पर्धेचे उदघाटन झाले. माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार व शिवसेना उपनेत्या जयश्री चंद्रकांत जाधव, कोल्हापूर महापालिका परिवहन समितीचे सभापती सत्यजित चंद्रकांत जाधव व बालगोपाल तालीम मंडळचे अध्यक्ष राजेंद्र कुरणे, उपाध्यक्ष निवास शिंदे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी केएसएचे जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, शिवसेनेचे हर्षल सुर्वे, पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, सुनील पवार, माजी नगरसेवक संभाजी जाधव, ओंकार जाधव, रौनक शहा, आप्पासाहेब साळोखे, युवराज कुरणे, रोहन शिंदे आदी उपस्थित होते.
दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यास शिवाजी तरुण मंडळचा संघ मैदानावर उपस्थित राहिला नाही. त्यावेळी उपस्थित असलेल्या फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळला पुढे चाल देण्यात आली. त्यामुळे फुलेवाडीने पुढील प्रवेश केला.
दिलबहारचा एकतर्फी विजय…
दिलबहार आणि उत्तरेश्वर संघातील सामन्यात पहिल्या २५ मिनिटांत गोलफलक कोरा राहिला. दिलबहारकडून झालेल्या एका चढाईत स्वयंम साळोखेने सेंटर सर्कलच्या पुढे मिळालेल्या चेंडूला थेट गोलजाळ्याची दिशा दाखवली. २५व्या मिनिटास पहिल्या गोलची नोंद झाली.
उत्तरार्धात थांगजालेन हाओकिपने दिलेल्या पासवर संकेत वेसणेकरने संघाचा दुसरा गोल ७१व्या मिनिटाला फलकावर आणला. जादावेत थांगजालेन हाओकिपने गोल नोंदवून ३-० अशी आघाडी भक्कम केली. दिलबहारच्या स्वयंम साळोखे , माणिक पाटील, प्रथम भोसले, सार्थक मगदूम, फेबिन गिब्स यांनी केलेल्या चढाया दिशाहीन फटके व समन्वयाअभावी व्यर्थ ठरल्या. उत्तरेश्वरकडून इलेन्स शर्मा, तुषार पुनाळकर, मयूर कदम, अथर्व पाटील, शोएब मणियार यांनी गोलसाठी केलेल्या चढाया समन्वयाअभावी वाया गेल्या. अखेर ३-० गोलची आघाडी राखतच दिलबहारने गुढीपाडवा सणाच्या पूर्वसंध्येला विजयाची गुढी उभारून शुभारंभ केला.
——————————
• जुना बुधवार – संध्यामठ : दु. १:३० वा.
• खंडोबा – सुभाषनगर : दुपारी ४ वाजता
——————————
दिलबहारने उभारली विजयाची गुढी!
RELATED ARTICLES
Mumbai
haze
27
°
C
27
°
27
°
61 %
2.6kmh
0 %
Wed
27
°
Thu
27
°
Fri
27
°
Sat
29
°
Sun
30
°

