कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्यावतीने संघाच्या ताराबाई पार्क येथील विकासकक्ष कार्यालयात भारताचे माजी संरक्षण मंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची ११३वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या हस्ते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी विश्वास पाटील म्हणाले की, महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण यांनी राज्याच्या विकासासाठी भक्कम पाया घातला. सहकार चळवळीला बळ देत ग्रामीण भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य माणसाला आर्थिक स्थैर्य देण्याचे मोठे काम त्यांनी केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्रात सहकारक्षेत्र अधिक मजबूत झाले. महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्थेला दिशा देण्यामध्येही यशवंतराव चव्हाण यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. गावपातळीवर लोकसहभागातून विकास घडवून आणण्याची संकल्पना त्यांनी रुजवली. आजही सहकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण विकास घडवताना त्यांच्या विचारांची प्रेरणा मिळत राहते.
यावेळी संघाचे संचालक अजित नरके यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक डॉ. एम. पी. पाटील यांनी केले. तर आभार पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंखे यांनी मानले. यावेळी संचालक प्रकाश पाटील, बाळासो खाडे, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील, संकलन व्यवस्थापक एस. व्ही. तुंरबेकर, दत्तात्रय वागरे, बाजीराव मुडूकशिवाले, अशोक पुणेकर, संभाजी पाटील, संग्राम पाटील, प्रताप पाटील, विनोद वानखेडे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संघाचे अधिकरी व कर्मचारी उपस्थित होते.
——————————
गोकुळतर्फे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
28.7
°
C
28.7
°
28.7
°
57 %
7.3kmh
0 %
Thu
29
°
Fri
30
°
Sat
28
°
Sun
28
°
Mon
28
°

