Homeशैक्षणिक - उद्योग डी. वाय. पाटील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठात ‘विकसित भारत युवा संसद’ स्पर्धा...

डी. वाय. पाटील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठात ‘विकसित भारत युवा संसद’ स्पर्धा उत्साहात

कोल्हापूर :
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत ‘मेरा युवा भारत’ कोल्हापूर यांच्यावतीने आयोजित ‘विकसित भारत युवा संसद’ ही जिल्हास्तरीय स्पर्धा डी. वाय. पाटील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ, तळसंदे येथे उत्साहात पार पडली. स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील ६० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून विविध विषयांवर विचारमंथन केले.
‘विकसित भारत युवा संसद’ म्हणजे तरुणांनी देशाच्या विकासाबद्दल विचार मांडण्यासाठी आणि संसदीय पद्धतीने चर्चा करण्यासाठी निर्माण केलेले व्यासपीठ आहे. युवावर्गाला लोकशाही प्रक्रिया आणि संसदीय पद्धतीची ओळख करून देणे आणि देशाच्या विकासाशी संबंधित विषयांवर विचार मांडणे आणि चर्चा करणे या हेतुने हा उपक्रम राबवला जातो. ‘आणीबाणीची ५० वर्षे : भारतीय लोकशाहीसाठी धडे’ या विषयावर हि स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये विद्यापीठाच्या कु. तन्वी रमेश भोसले हिने जिल्हास्तरावर ५वा क्रमांक मिळवला असून  राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.
या कार्यक्रमात ‘युवा कनेक्ट’ या सत्रात अवधूत गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र खोत यांनी ‘युवा कनेक्ट’ उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.
या स्पर्धेत बुद्धा सुखदेव कोरवी (राजाराम महाविद्यालय) याने प्रथम क्रमाक प्राप्त तर वैष्णवी रविंद्र पोतदार (शिवाजी विद्यापीठ) हिने द्वितीय, अनुष्का धनंजय कुरणे (न्यू लॉ कॉलेज) याने तृतीय, अभिषेक तानाजी सुतार (भारती विद्यापीठ) याने चौथा तर तन्वी रमेश भोसले (डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ) हिने पाचवा क्रमांक मिळवला. या सर्वांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण अभिजित शिंदे, डॉ. प्रल्हाद माने, सोमनाथ साळुंखे, डॉ. प्रविण पोवार व डॉ. विनायक शिंदे यांनी केले.
विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. ए. के. गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमास जिल्हा युवा अधिकारी पूजा सैनी, विद्यापीठाचे मुख्य वित्त अधिकारी सुजीत सरनाईक, विद्यार्थी कल्याण संचालक अभिजित शिंदे आदी उपस्थित होते. प्रियांका पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर आभार दिशा मालगावी यांनी मानले. निलेश कांबळे, संकेत गुरव यांनी परिश्रम घेतले.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
26.8 ° C
26.8 °
26.8 °
66 %
4.3kmh
0 %
Sat
27 °
Sun
30 °
Mon
30 °
Tue
27 °
Wed
27 °

Most Popular

You cannot copy content of this page