कोल्हापूर :
जयपूर येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ महिला बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विवेकानंद महाविद्यालयाची विद्यार्थिनी सृष्टी कुलकर्णी बी.बी.ए भाग ३ हिने रौप्य पदक प्राप्त केले. या कामगिरीच्या जोरावर मेरठ येथे होणाऱ्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बुद्धिबळ महिला स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या संघामध्ये आपले स्थान निश्चित केले.
या यशाबद्दल सृष्टी कुलकर्णी हिला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले. तसेच विवेकानंद कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. श्रुती जोशी, जिमखाना विभागप्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, रजिस्ट्रार एस. के. धनवडे, सुरेश चरापले तसेच तिच्या आई-वडिलांचे मार्गदर्शन तिला लाभले.
विवेकानंदच्या सृष्टी कुलकर्णीची ऑल इंडिया बुध्दीबळ स्पर्धेसाठी निवड
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
26.8
°
C
26.8
°
26.8
°
66 %
4.3kmh
0 %
Sat
27
°
Sun
30
°
Mon
30
°
Tue
27
°
Wed
27
°

